मुंबई : मॉडेल, अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान हे एकेकाळी सेलिब्रिटी कपल्सच्या यादीत गणलं जाणारं जोडपं होतं. पण, १९ वर्षांच्या त्यांच्या वैवाहिक आयुष्यात काही कारणांनी दुरावा आणि त्या दोघांनीही घटस्फोट घत या नात्याला पूर्णविराम दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलायका आणि अरबाजच्या नात्यात आलेल्या दुराव्यामुळे त्यांच्या खासगी आयुष्याविषयीही बऱ्याच चर्चा झाल्या. पण, त्या दोघांनीही आतापर्यंत कधीच जाहीरपणे आपल्या आयुष्यात आलेल्या या वळणाविषयीच्या प्रतिक्रिया दिल्या नाहीत. 


सध्याच्या घडीला मात्र मलायकाने सेलिब्रिटी स्टायलिस्ट अनिता श्रॉफ अदजानियाच्या चॅट शोवर हजेरी लावत आपल्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या गोष्टीविषयी उलगडा केला. 


घटस्फोटानंतर, आपल्या सभोवती असणाऱ्या प्रत्येक गोष्टीमुळे या क्षणाला एक प्रकारची शांतता असल्याची अनुभूती होतेय, असं ती म्हणाली. 


अरबाजसोबत घटस्फोट घेतेवेळी ते क्षण आपल्यासाठी तितके सोपे नसल्याचंही तिने यावेळी स्पष्ट केलं. 'त्यावेळी माझ्या डोक्यात जे विचार सुरु होते, ते माझ्यामते प्रत्येकाच्याच डोक्यात सुरु असते. नेमकं काय झालं होतं? आयुष्यात हे असं वळण आलंच कसं? हे प्रश्न मला पडत होते', असं ती म्हणाली. 


येणाऱ्या अडचणींचा सामना करत त्याचा आपल्या आयुष्यावर फार परिणाम होऊ न देण्याकडे तिने जास्त लक्ष दिलं. वेळच सर्वकाही निश्चित करेल, या तत्वावर ती आयुष्य जगत राहिली. 


मलायका आणि अरबाज यांच्या नात्यात कायमचा दुरावा आला असला तरीही त्यांच्यातील मैत्री मात्र आजही टीकून आहे. विविध एकमेकांच्या कुटुंबासोबत असणारं त्यांचं नात तसूभरही बदललेलं नाही.