Malaika Arora Latest Photos: अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena kapoor khan) हिच्या वाढदिवसानिमित्त मलायकानं नुकतीच हजेरी लावली. जिथं बर्थडे गर्लऐवजी जास्त चर्चा तिच्या या बेस्ट फ्रेंडचीच झाली. मलायकाविषयीच्या या चर्चा शमत नाहीत, तोच पुन्हा एकदा तिनं माध्यमांच्या आणि नेटकऱ्यांच्या नजरा वळवल्या. नुकतंच मलायकाला तिच्या घरापाशी पाहिलं गेलं यावेळी ती कॅज्युअल पण तितक्याच बोल्ड रुपात दिसली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलायकाचा हा लूक सध्या 'टॉक ऑफ द टाऊन' ठरत आहे. जिथं ती स्ट्रीप्ड ओवरसाईज (Oversize shirt) शर्टमध्ये दिसत आहे. रात्री उशिराच मलायका जेव्हा या रुपात बाहेर आली, तेव्हा तिथं असणाऱ्या अनेकांच्या नजरा तिनं वळवल्या. 


ती कुठेतरी घाईघाईतच जाताना दिसली. कारमधून उतरल्यानंतर फोटोग्राफर्ससमोर पोझ देण्याऐवजी ती तडक निघाली आणि तिथंच तिच्या Mood चा अंदाज अनेकांना आला. 




अधिक वाचा : बाबो... 1300 वर्षांपूर्वीचा खजिना जगासमोर, पाहा कसं दिसतं अस्सल सोनं


या साऱ्यामध्ये मलायकाची एक कृती वारंवार पाहायला मिळाली ती म्हणजे तोडक्या कपड्यांमुळे आलेली असहजता. एरव्ही बोल्ड लूक अतिशय सुरेखपणे हाताळणारी मलायका यावेळी मात्र तिच्या या तोकड्या कपड्यांमुळे काहीशी त्रस्त दिसली. पण, शेवटी ती मलायकाच... प्रसंग पाहत तिनं कपडे सावरले आणि पुढे निघून गेली. 



दरम्यान, वय वाढत असलं तरीही मलायकाच्या चेहऱ्यावर असणारं सौंदर्य अद्यापही टिकून आहे. दैनंदिन सवयी आणि त्याला असणारी सकारात्मकतेची जोड हेच तिच्या काही सोशल मीडिया पोस्ट पाहून लक्षात येत आहे.