मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा ही कायमच तिच्या फिटनेसमुळं चर्चेत असते. वयाच्या या टप्प्यावरही मलायकानं स्वत:वर घेतलेली मेहनत आणि कमवलेली शरीरयष्टी भल्याभल्या अभिनेत्रींना लाजवणारी. अशा या मलायकावर भाळणारेही कमी नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माणसंच काय घेऊन बसलात, ही मलायका आता तर तिच्या प्रेमानं आणि तिच्या एका Kiss नं एका लहानश्या माशाला चक्क जिवंत केलं. 


कागदावर काढलेल्या चित्राला माशामध्ये बदलताना पाहून फक्त मलायकाच नाही, तर किरण खेर, करण जोहर यांनाही धक्का बसला. 


India's Got Talent या रिअॅलिटी शोच्या निमित्ताने एका जादुगरानं अशी जादू दाखवली जी पाहून सगळेच थक्क झाले.


मुख्य म्हणजे हा व्हिडीओ नवा नाही, 2015 मधील एपिसोडमधील हा एक लहानसा व्हिडीओ, जिथं एक सॉफ्टवेअर इंजिनीयर धमाकेदार जादू करुन दाखवतो. 


जादू करत असताना तो मलायकाच्या जवळ येतो आणि कागदावर काढलेल्या एका माशाच्या चित्राला तिला KISS करायला सांगतो. 



मलायकानं किस करताच तो पेपर चुरगळसून पाण्यानं भरलेल्या ग्लासात टाकतो. पाहताक्षणीच त्या कागदाचा मासा होतो. 


ही अफलातून जादू पाहून सगलसेच थक्क होतात. मलायकाच्या किसमुळं खरंच हे झालं का याच विचारात सर्वजण पडतात, तर काहीजण मात्र त्या जादुगराचं कौतुक करताना दिसतात.