मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर यांच्या लग्नांच्या चर्चांना नेहमीच सूरू असतात. आज पून्हा एकदा त्यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आजच्या या चर्चा निव्वळ चर्चेपुरत्या राहिल्या नाहीत तर यावर मोठी प्रतिक्रीया ही समोर आली आहे. अर्जुन कपूरने आता या लग्नाच्या चर्चेवर पहिली प्रतिक्रीया दिली आहे.
 
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा गेल्या अनेक वर्षापासून एकमेकांना डेट करतायत. दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते आणि त्यांच्या केमिस्ट्रीही चर्चा असते. त्यामुळेच या जोडप्याच्या लग्नाच्या बातम्या झळकत असतात. आज पून्हा एकदा अर्जुन आणि मलायकाच्या लग्नाची बातमी समोर आली होती. यावर आता अर्जुनने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


अर्जुन कपूरने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहले की, "माझ्यापेक्षा इतर लोकांना माझ्या आयुष्याबद्दल अधिक माहिती कशी आहे याच्या मी प्रेमात आहे, असे त्याने म्हटले आहे. अर्जुन कपूरची ही पोस्ट अलीकडच्या काळात सुरू असलेल्या त्याच्या लग्नाच्या बातम्यांशी जोडली जात आहे. अर्जुन कपूरच्या या पोस्टवरून लग्नाच्या बातम्या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.