90 च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींचं नाव घेतलं तर त्यात मनिषा कोईरालाचाही (Manisha Koirala) उल्लेख आवर्जून करावं लागेल. सौदागर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये (Boll) पदार्पण करणाऱ्या मनिषा कोईरालाने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. मधल्या काळात मनिषा कोईराला बॉलिवूडमधून गायब झाली होती. कॅन्सर झाल्याने तिचा आयुष्याशी संघर्ष सुरु होता. नुकतंच संजय लिला भन्साळी यांच्या 'हिरामंडी' वेब सीरिजमधून मनिषा कोईरालाने दमदार पुनरागमन केलं होतं. मनिषा कोईरालाने एका मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. 90 च्या दशकात चित्रपटसृष्टीत असे अनेक समज होते ज्यामुळे आपल्याला त्रास होत होता, मग ते ड्रिंकिंग असो किंवा अफेअर अशी खंत तिने व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडमध्ये (Bollywood) नेहमीच पुरुष आणि महिलेमध्ये फरक केला जातो. ज्या गोष्टी पुरुषाने केल्यानंतर त्याच्याकडे 'माचोमॅन' म्हणून पाहिलं जातं, त्याच गोष्टी महिलेने केल्यास तिच्याकडे तुच्छतेने पाहिलं जातं अशी खंत मनिषा कोईरालाने (Manisha Koirala) व्यक्त केली आहे. 


मनिषाने सांगितलं की, "मला त्यावेळी फार टीकेचा सामना करावा लागला होता याचं कारण त्यावेळी हिरोच्या अनेक प्रेयसी असल्या तरी चालत होतं आणि त्यांना माचोमॅन म्हटलं जायचं. पण अभिनेत्रीला हे शोभायचं नाही. आमच्यासाठी म्हटलं जायचं की, 'नाही, नाही कोणी मला हात लावू शकत नाही' आणि आम्ही जणू काही अस्पृश्य. आहोत. ही फार सहज उपलब्ध होणारी मुलगी आहे असंही समजलं जायचं. पण मी माझ्या हिशोबाने केलं. माझं खासगी आयुष्य आहे किंवा माझा प्रियकर आहे याचा अर्थ हे नाही की मी अनप्रोफेशनल आहे. मला माझं काम आवडतं. आमच्याकडे अभिनेत्रींचा मान राखण्याचे काही अतिशय संकुचित मार्ग होते, जे मला मान्य नव्हते".


मला खोटं बोलायला शिकवलं


मनिषा कोईरालाने 90 च्या दशकातील काही किस्सेही सांगितले. "सौदागर चित्रपटाच्या पार्टीदरम्यान मी कोक आणि वोडका एकत्र केलं आणि पित होती. मला माझ्या आसपासच्या लोकांनी तू कोणलाहाी वोडका पित आहेस हे सांगू नकोस, कारण अभिनेत्री दारु पित नाहीत असं सांगितलं. मी फक्त कोक पित आहे असं सांग असा सल्ला देण्यात आला. माझ्यासाठी ती फार नवी गोष्ट होती. मी नवीन काहीतरी शिकले होते. म्हणून मी माझ्या आईला सांगितले, 'मी कोक पीत आहे', आणि तिला माहित होते की मी त्यात वोडका टाकला आहे. ती म्हणाली, 'ऐक, जर तू वोडका पीत आहेस, तर सांग मी वोडका पीत आहे, खोटं बोलू नकोस. 'तुम्ही कोक पीत आहात' यासारख्या छोट्या गोष्टींबद्दल खोटं बोलू नकोस. जर मी एखाद्याला डेट करत असेन तर हो डेट करते. जर तुम्हाला मला जज करायचं असेल तर करु शकता. पण मी अशीच आहे आणि माझ्या अटींवर आयुष्य जगते," असं मनिषा कोईरालाने सांगितलं.


मनिषा कोईरालाने सौदागर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर तिचं नाव विवेक मुश्रानशी जोडलं गेलं होतं. नाना पाटेकर यांच्याशीही तिचं अफेअर असल्याच्या चर्चा होत्या. मनिषाने सम्राट दहलशी लग्न केलं होतं, पण नंतर ते वेगळे झाले होते.