मुंबई : खासगी जीवन असो किंवा कलाविश्वातील वावर, काही चेहरे हे त्यांच्या वेगळेपणासाठी प्रसिद्ध असतात. ओघाओघाने त्यांच्या भूमिकांनाही विचारात घेतलं जातं, त्याचप्रमाणे त्यांच्या प्रत्येक कृतीवर अनेकांचं लक्ष असतं. अशाच चेहऱ्यांपैकी एक नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता (neena gupta ) यांचं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वयाची साठी ओलांडली असली, तरीही ही अभिनेत्री तिच्या सौंदर्यानं चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहेत. नीना यांच्या फॅशन स्टेटमेंटपासून ते अगदी त्यांच्या बोल्ड लूक आणि तितक्याच बोल्ड निर्णयांमुळे त्या कायमच बॉलिवूडप्रेमींच्या मनावर राज्य करतात. अशा या अभिनेत्रीनं आपल्या आत्मचरित्रपर पुस्तकाचं अनावरण काही दिवसांपूर्वी केली. जीवनातील आतापर्यंतचा प्रवास, चढ उतार त्यांनी या पुस्तकात लिहिले. 


नीना यांनी हे पुस्तक बॉलिवूडमधील त्यांच्या खास मंडळींना स्वत:च्या हातानं दिलं. ज्येष्ठ कवी गुलजार यांनाही नीना यांनी आपल्या 'सच कहूं तो' या पुस्तकाची एक प्रत दिली. हे पुस्तक देण्यासाठी त्या तोकड्या कपड्यांमध्ये पोहोचल्या आणि कोरोना नियमांमुळे दुरूनच त्यांनी हे पुस्तक गुलजार यांना दिलं. नीना यांचा हा बोल्ड अंदाज नेटकऱ्यांना मात्र पटला नाही. त्यांना यावरुन बरेच बोल सुनावण्यात आले, खिल्लीही उडवली गेली. 


...म्हणून पहिल्याच वर्षात तुटलेलं लग्न; नीना गुप्तांना का होतोय पश्चाताप?


 


आपली तोकड्या कपड्यांमुळे खिल्ली उडवली जात असल्याचं पाहून गुप्ता यांनी एका मुलाखतीत ट्रोलर्सना उत्तर दिलं. 'मी तीस वर्षांपूर्वीचं सांगत आहे. जेव्हा मसाबाचा जन्मही झाला नव्हता.... मला माझं पहिलं टेनिस रॅकेट गुलजार यांनी दिलं होतं. ते दररोज अंधेरीला टेनिस खेळण्यासाठी जात होते आणि माझं घर जुहूमध्ये होतं. त्यामुळे मी त्यांना म्हटलं मलाही टेनिस शिकायचंय. तेव्हापासून ते रोज सकाळी 6 वाजता मला नेण्यासाठी येत. तेव्हा तर त्यांनीही शॉर्ट्स घातलेले असायचे आणि मीसुद्धा. तेव्हा या वेंधळ्यांना (ट्रोलर्सना) सांगा की आम्ही तेव्हापासून एकमेकांना असेच शॉर्ट्समध्ये भेटतोय', असं त्या म्हणाल्या. 


कोणाला काय म्हणायचंय, त्याची मुभा त्यांना आहे. त्याचप्रमाणं मला जे करायचंय त्यासाठी मी मोकळी आहे, असं म्हणत आपण कोणालाही शिकवणूक वगैरे देत नसल्याचं सांगितलं.