बर्थडे पार्टीत अभिनेत्रीचा धुमाकूळ; टेबलवर चढून, प्लेट तोडून नुसता राडा
वाढदिवस म्हटलं, की वाढदिवसाची पार्टी आणि त्यानिमित्तानं होणारा कल्ला आलाच
मुंबई : वाढदिवस म्हटलं, की वाढदिवसाची पार्टी आणि त्यानिमित्तानं होणारा कल्ला आलाच. खास मित्रांची आणि जवळच्या माणसांची उपस्थिती, शुभेच्छांचा होणारा वर्षाव आणि चहूबाजुंनी असणारं अनंदाचं वातावरण हेच चित्र वाढदिवसाच्या निमित्तानं पाहायला मिळतं. (Bollywood )
एक बॉलिवूड अभिनेत्री मात्र या साऱ्याला अपवाद ठरली आहे. 37 व्या वाढदिवसानिमित्त या अभिनेत्रीनं अशी काही दणक्यात पार्टी केली, की या पार्टीपेक्षा त्यामध्ये तिनं घातलेला धुमाकूळ सर्वाधित चर्चेत राहिला.
ही अभिनेत्री आहे नुसरत भरुचा. डीप नेकलाऊन कट असणारा गाऊन घालत नुसरतनं स्वत:च्या बर्थडे पार्टीलाला एंट्री केली आणि सर्वांनी एकच कल्ला केला. नुसरत तिथं सर्वांना भेटली, बेभान नाचली. इतक्यावरच न थांबता नुसरतनं नव्या ट्रेंडप्रमाणे हॉटेलमध्ये चक्क प्लेटही फोडल्या. (Actress nushrratt bharuccha smashed the plates on her birthday video viral )
सोशल मीडियावर सध्या तिच्या या बर्थडे पार्टीतले काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड चर्चेतही आहेत.
वाढदिवस असो किंवा आणखी काही, जीवनातील प्रत्येक क्षण हा कायम मनमुरादच जगावा हेच जणू नुसरत तिच्या या वाढदिवसाच्या पोस्टमधून सांगताना दिसत आहे.
मागील काही दिवसांपारून ती आगामी 'जनहित मे जारी' या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटामध्ये ती कंडोम विकणाऱ्या सेल्स गर्लच्या भूमिकेत झळकणार आहे. 10 जूनला तिचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.