Preity Zinta Karwa Chauath 2022: काल संपुर्ण देशात करवा चौथचा उपवास साजरा (Karwa Chauth 2022) करण्यात आला. अनेक बॉलीवूड अभिनेत्रींनीही आपल्या पतीसोबत करवा चौथ साजरी केली. चंद्र शोधण्यासाठी आपापल्या घरी सर्वच बॉलीवूड कपल्सनी करवा चौथचा बेत आखला होता, अगदी मौनी रॉयपासून (Mouni Roy) शिल्पा शेट्टीपर्यंत (Shilpa Shetty) सगळ्यांनीच करवा चौथ साजरी केली. (bollywood actress preity zinta celebrates karwa chauth with her husband gene goodenough)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सेलिब्रेटी करवा चौथ सोशल मीडियावर (Celebs Karwa Chauth) ट्रेन्डिंग आहे. याच दरम्यान एका लोकप्रिय अभिनेत्रीनं आपला करवा चौथचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ही अभिनेत्री आहे प्रिटी झिंटा (Actress Preity Zinda). जेन गुडइनफ (Gene Goodenough) या परदेशी बिझनेसमनशी तिनं विवाह केला आहे. तिनं लॉस एन्जेलिस येथे आपल्या राहत्या घरी करवा चौथ साजरी केली आहे. 


आणखी वाचा - आई नीतू कपूरनं Ranbir चा फोटो शेअर करतानाच नेटकरी म्हणाले...


करवा चौथच्या निमित्तानं प्रिटी झिंटानं लाल रंगाचा शरारा घातला होता. हातात तिनं बांगड्या घातल्या होत्या आणि डोक्यावर पदर घेत हातात पुजेचे ताटही घेतलं होतं. या रूपात प्रिटी झिंटा फारच सुंदर दिसतं होती. यावेळी आपला करवा चौथचा व्हिडीओ (Karwa Chauth Video) आणि फोटो तिनं इन्टाग्रामवरून शेअर केला आहे परंतु यंदा करवा चौथच्या वेळेस मात्र प्रिटी झिंटाची फजिती झालेली पाहायला मिळाली. 





स्वतःहून तिनं पोस्ट शेअर करत सगळ्यांना करवा चौथच्या शुभेच्छा दिल्या परंतु त्याखाली तिनं एक पोस्ट लिहिली ज्यात ती म्हणाली की येथे लॉस एन्जलेसमध्ये चंद्र दिसलाच नाही. खूप शोधायचा प्रयत्न केला परंतु चंद्र मला काही दिसला नाही, अशा भाषेत तिनं आपला फोटो शेअर करताना लिहिलं आहेत. 


आणखी वाचा - करीना, विद्या बालनसोबत जुळलं नाव, पण अभिनेत्याने अरेंज मॅरेज करत सगळ्यांनाच दिला धक्का


2016 साली प्रिटीनं गेन गुडइनफ ह्याच्याशी लग्न केलं. वयाच्या 46 व्या वर्षी प्रिटी दोन जुळ्या मुलांची आई झाली आहे. सध्या आपल्या पतीसोबत ती परदेशात वास्तव्यास आहे.