Preity Zinta On Girl Safety in Bollywood : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्रिती झिंटाचे नाव कायमच पाहायला मिळते. तिने अनेक हिंदी, तेलुगू, पंजाबी चित्रपटात काम केले. १९९८ साली प्रदर्शित झालेल्या ‘दिल से’ चित्रपटाद्वारे प्रितीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला. ‘सोल्जर’, ‘दिल चाहता है’, ‘दिल है तुम्हारा’, ‘कल हो ना हो’, ‘कोई मिल गया’, ‘लक्ष’, ‘सलाम नमस्ते’, ‘वीर झारा’ हे प्रितीचे चित्रपट चांगलेच गाजले. प्रितीला कायमच तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाते. आता प्रिती झिंटाने बॉलिवूडबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. 


प्रिती झिंटा नवीन वक्तव्यामुळे चर्चेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रिती झिंटा ही सध्या सिनेसृष्टीपासून दूर आहे. पण ती कायमच काही ना काही कारणांनी चर्चेत असते. आता प्रितीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत प्रिती ही बॉलिवूडमधील नेपोटीझमबद्दल बोलताना दिसत आहे. आता प्रितीने बॉलिवूड हे मुलींसाठी सुरक्षित नाही, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. 


"बॅकग्राऊंड नसलेल्या लोकांनी बॉलिवूडमध्ये येऊ नये"


"कोणतेही बॅकग्राऊंड नसलेल्या मुलं किंवा मुलींसाठी बॉलिवूड सुरक्षित नाही. फक्त चित्रपट नाही, तर कोणतंही बॅकग्राऊंड नसलेल्या लोकांनी बॉलिवूडमध्ये येऊ नये. इथे असे अनेक लोक आहेत, जे काम मिळवण्यासाठी काहीही करायला तयार होतात. याचाच अर्थ मी जर रस्त्याच्या मध्ये उभी राहून आ बैल मुझे मार किंवा एखाद्या कारने मला धडक दिली तर काय होईल?" असे वक्तव्य प्रिती झिंटाने केले आहे. तिच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे. 


सध्या सिनेसृष्टीपासून दूर


दरम्यान प्रिती झिंटाने तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान जीन गुडइनफसोबत गुपचूप लग्न केले. 29 फेब्रुवारी 2016 रोजी लॉस एंजलसमध्ये तिचा विवाहसोहळा पार पडला. प्रिती आणि जीनच्या लग्नाला मोजकेच पाहुणे उपस्थित होते. त्यांच्या लग्नाचे फोटो जवळपास 6 महिन्यांनी समोर आले होते. त्यांच्या लग्नाला पाच वर्षे उलटल्यानंतर प्रिती आई झाली. तिने सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला. जय आणि जिया अशी त्या दोघांची नावे आहेत. सध्या प्रितीने सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला आहे. ती सध्या मुलांच्या संगोपनावर लक्ष केंद्रीत करत असल्याचे दिसत आहे.