मुंबई: अभिनेत्री प्रियांका चोप्रा गेल्या काही काळापासून परदेशातच जास्त वेळ व्यतीत करत असली तरीही सध्या मात्र ती पुन्हा एकदा हिंदी कलाविश्वाकडे वळल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून ती भारतात आली असून द स्काय इज पिंक या चित्रपटाच्या चित्रीकरणाला ती जास्त वेळ देत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियांका भारतात असल्यामुळे तिचा होणारा पती, अमेरिकन गायक निक जोनासही तिच्या पाठोपाठच भारतात आला असून त्याने एक प्रकारे आपल्या ‘देसी गर्ल’ला सरप्राईजच दिलं असं म्हणायला हरकत नाही.


विमानतळावर त्याने छायाचित्रकारांसमोर हात उंचावत त्यांनी केलेल्या स्वागताचा स्वीकारही केला.


प्रियांकाने चित्रीकरणातून वेळ काढत निकसोबत ती डिनर डेटवर गेली. त्याचवेळी लगेचच त्यांच्यावर छायाचित्रकारांच्या नजरा खिळल्या.



डिनर डेटसाठी प्रियांका आणि निकने काळ्या रंगाच्या ड्रेसलाच प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं. ‘देसी गर्ल’चा हा लूकही तिच्यावर फार खुलून दिसत होता.  


काही दिवसांपूर्वीच प्रियांका आणि निकने त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली. ज्यानंतर मोस्ट हॅपनिंग सेलिब्रिटी कपल्सच्या यादीत ही सेलिब्रिटी जोडी विविध कारणांनी चर्चेचा विषय ठरली. त्यातीलच एक कारण म्हणजे त्यांची केमिस्ट्री.


निक आणि प्रियांका आता त्यांच्या लग्नाची तारीख कधी जाहीर करतात याकडेही चाहत्यांसोबतच आंतरराष्ट्रीय कलाविश्वाचंही लक्ष लागून राहिलेलं आहे.