Priyanka Chopra New Look : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनसने सोशल मीडियावर नुकतेच समुद्रकिनाऱ्यावरील फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताच चर्चांना उधाण आलं आहे. जेव्हा प्रियांकाने हे फोटो शेअर केले तेव्हा सर्वांच्या नजरा फोटोमध्ये तिसऱ्या म्हणजेच प्रियंका चोप्राची मुलगी मालतीकडे सर्वजण पाहतच राहिले. यासोबतच दोघांनी 2025 स्वागत केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियंकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पती निक जोनास आणि मुलगी मालतीसह अनेक फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये प्रियंका तिच्या आलिशान व्हिलाच्या टेरेसवर केशरी रंगाची बिकिनी घालून उभी असलेली दिसत आहे. प्रियंका चोप्रा आणि निक जोनस पोज देत असताना मालती ही समुद्राच्या पाण्यामध्ये खेळताना दिसत आहे. 


प्रियंका चोप्राचा बिकिनी लूक 


प्रियंका चोप्राने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती निकसोबत लाल रंगाची बिकिनी घालून समुद्रकिनाऱ्यावर दिसत आहे. तर तिची मुलगी पाण्यामध्ये खेळताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये अभिनेत्री आणि निक जोनस निवांत बसलेले दिसत आहेत. तर इतर फोटोंमध्ये प्रियंका चोप्रा आणि मुलगी मालती एकत्र दिसत आहेत. यावेळी तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, मोकळेपणाने जीवन जगणे हे 2025 मध्ये माझे ध्येय आहे. आनंद, आनंद आणि शांती लाभो. 2025 मध्ये सर्वांना खूप काही मिळो. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. 



प्रियंका चोप्राचा आगामी चित्रपट


अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर प्रियंकाकडे अनेक प्रकल्प आहेत. 'हेड्स ऑफ स्टेट' याचा देखील समावेश आहे. यामध्ये तिच्यासोबत इदरीस एल्बा आणि जॉन सीना देखील दिसणार आहे. हा एक अॅक्शन आणि कॉमेडी चित्रपट आहे. ती 'द ब्लफ' चित्रपटात 19 व्या शतकातील कॅरिबियन समुद्री डाकूची भूमिका साकारणार आहे. हा एक ड्रामा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात कार्ल अर्बन, इस्माइल क्रूज कॉर्डोवा, सफिया ओकले-ग्रीन आणि वेदांतेन नायडू हे मुख्य भूमिकेत असणार आहेत.