प्रियंका चोप्राला हवाय असा नवरा, मुलाखतीत खुलासा
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा नेहमीच आपल्या कामामुळे आणि बिनधास्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा नेहमीच आपल्या कामामुळे आणि बिनधास्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणा-या प्रियंकाने पुन्हा एकदा सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तशी प्रियंका तिच्या पर्सनल लाईफबद्दल फारच कमी बोलते. पण यावेळी तिने तिच्या पर्सनल लाईफबद्दल दिलखुलास गप्पा केल्यात.
किती मुलं-बाळं हवीत प्रियंकाला?
प्रियंकाने कधीही तिच्या अफेअरच्या गॉसिप्सवर रिअॅक्ट केलं नाही. पण एका आंतरराष्ट्रीय मॅगझिनला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या मनातील गोष्ट केली आहे. प्रियंकाने एका मुलाखतीत सांगितले की, ‘तिला खुपसारी मुलं हवी आहेत. पण अडचण ही आहे की, असे कुणासोबत होईल हे तिला माहिती नाही.
कुटुंब आणि लग्नावर प्रियंकाला विश्वास
प्रियंकाने यादरम्यान हेही सांगितले की, ती ब-याच वर्षांपासून सिंगल आहे आणि तिला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. मी हे अटेंशन मिळवण्यासाठी बोलत नाहीये. तर जे आहे ते सांगत आहे. मी लग्नाबाबत खूप सिरीअस आहे आणि माझा परिवार या संकल्पनेवर पूर्ण विश्वास आहे.
प्रियंका या गोष्टीने होईल इम्प्रेस
या मुलाखतीत तिने तिचं मन कसं जिंकता येईल हेही सांगितलं. प्रियंका म्हणाली की, जर तिचा पार्टनर तिची काळजी घेऊ शकला नाही आणि तो स्मार्ट नसला तर त्यांच्यात पुढे काहीच होणार नाही. इतकेच नाहीतर प्रियंकाने हेही सांगितले की, तिचा पार्टनर जर तिला एन्गेज ठेवू शकला नाहीतर ती त्याच्यासोबत राहणार नाही. तसेच मी खूप भावूक आणि रोमॅंटिक आहे, त्यामुळे तो तसा असावा असेही ती म्हणाली.