मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनं बॉलवूडमध्ये आपली ओळख प्रस्थापित केल्यानंतर ही अभिनेत्री परदेशात जाऊन स्थिरावली. हॉलिवूडमध्येही तिनं आपली वेगळी जागा तयार केली. जागतिक स्तरावरील अभिनेत्री अशी प्रियांकाची ओळख आहे. ही अभिनेत्री परदेशात गेली असली तरीही भारताशीही तिची नाळ जोडली गेली आहे. इतकंच नव्हे, तर प्रियांकापाठोपाठ तिच्या बहिणीही या झगमगणाऱ्या जगतात त्यांची नवी ओळख बनवू पाहत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तुम्ही म्हणाल, परिणीती चोप्रा तर बऱ्यापैकीच प्रसिद्ध झालीये. तर, परिणीती नव्हे, प्रियांकाची दुसरीच एक बहीण सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. तिचं नाव आहे मन्नारा चोप्रा. मन्नारा सौंदर्य आणि बोल्डनेसच्या बाबतीत प्रियांकालाही मागे टाकत आहे. अभिनेत्री आणि मॉडेल असणारी मन्नारा तेलुगू आणि हिंदी चित्रपटांतूनही झळकली आहे.




प्रियांका आणि परिणीतीची ही चुलत बहीण आहे. 2014 मध्ये ‘जिद’ या चित्रपटातून मन्नारानं बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. तेव्हाच ती कमालीची प्रसिद्धीझोतात आली होती. दिल्लीतील समर फिल्ड्स स्कूलमधून मन्नारानं बीबीएची पदवी घेतली आहे. शिवाय तिनं फॅशन डिझायनिंगचीही डिग्री घेतली आहे. शिक्षण घेतल्यानंतर तिनं मुंबईची वाट धरली. इथं तिनं मॉडेलिंग करिअरची सुरुवात केली. अभिनयात सक्रिय होण्याआधी तिनं कोरिओग्राफीतही नशीब आजमावलं होतं.