मुंबई : देशाच्या कोणत्याचं कोपऱ्यात महिला सुरक्षित नासल्याचं वास्तव चित्र सर्वत्र दिसत आहे.  मुंबईतील साकीनाका (Saki Naka Rape Case) परिसरात दिल्लीतील निर्भयासारखा (Nirbhaya) धक्कादायक प्रकार घडला होता. एका महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार उघडकीस आला. गंभीर जखमी झालेल्या पीडितेचा शनिवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. भारतात होणाऱ्या बलात्कार आणि महिला अत्याचारांवर अभिनेत्रींनी संताप व्यक्त करत उद्विग्न सवाल केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री तापसी पन्नू, आलिया भट्ट, करीना कपूर खान, कल्कि केक्ला आणि अनुष्का शर्माने घटनेवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. करीना कपूरने बातमी शेअर करत तुटलेल्या हार्टचा इमोजी शेअर केला  तर दुसरीकडे तापसी पन्नू नाराजी व्यक्त केली आहे. तापसी म्हणली, 'आज कोणती बातमी... रोजची बातमी... सतत असचं घडत आहे... कारण तिने जगण्यासाठी लढा दिला होत... आपला जीवन वाचवण्यासाठी तिला बक्षीस मिळालं...'



आलिया म्हणाली, 'हा काय मुर्खपणा सुरू आहे. ही गोष्ट प्रचंड संतापजनक आहे...' सतत होणाऱ्या महिला अत्याचारांवर बॉलिवूड अभिनेत्रींनी आवाज उठवला आहे. 



महिलांवर होणारे अत्याचार पाहाता अभिनेत्री कल्कि केक्ला म्हणाली, 'हाच एक मार्ग आहे का आरोपींचे गुन्हे उघडकीस आणण्याचे. ते लोक किती वर्षांचे होते? काय करत होते? त्यांनी केलेला हा पहिलाचं गुन्हा आहे? ही लोक आपल्या आसपास फिरत आहेत. आपल्याला त्यांना समोर आणायला हवं...'


बॉलिवूड कलाकार नेहमीच समाजातील वाईट गोष्टींवर प्रश्न उपस्थित करत असतात आणि पीडितांना न्याय देण्याची मागणी करत असतात. यापूर्वीही अनेक बॉलिवूड सिलेब्सने बलात्कार पीडितांना न्याय मागितला आहे आणि आरोपींचा निषेध केला आहे.