मुंबई : बॉलिवूडचे सुप्रसिद्ध जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी बऱ्याच वर्षानंतर आपल्या दोन्ही मुलांसह म्हणजेच सनी देओल आणि बॉबी देओल यांच्या सोबत बॉलिवूडमध्ये कमबॅक केले. या सिनेमाचे नाव होते यमला पगला दिवाना. आता यमला पगला दिवाना फिर से या सिनेमातून हे तिघेही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सिनेमात सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांचा खास परफॉर्मन्स असणार आहे. तर सिनेमात रेखाचे नावही जोडले गेले आहे. यात रेखा गाण्याचे रॅपिंग करताना दिसणार आहे. या सिनेमात जूने गाणे राफ्ता-राफ्ता रीक्रीएट करण्यात आले असून यात रेखा आणि धर्मेंद्र पुन्हा एकदा एकत्र थिरकताना दिसणार आहेत.


रेखांची गायकी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेखा या गाण्यात रॅपिंगही करणार आहेत. या गाण्याच्या काही ओळी खुद्द रेखा यांनी गायल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, रेखा त्यांच्या कहानी किस्मत की चे गाणे राफ्ता-राफ्ता आणि तिसरी मंजीलचे गाणे ओ मेरे सोना रे चे रॅपिंग करताना दिसतील.


रियालिटी शो मधून त्यांच्या कलेची जादू


काही दिवसांपूर्वी रेखा टी.व्ही. रियालिटी शो रायजिंग स्टारमध्ये सहभागी झाल्या होत्या. या शो त त्यांनी आपल्या आवाजाची जादू दाखवली आहे. या शो मध्ये रेखाने आपल्या कलांची झलक दाखवली. या कार्यक्रमात त्यांनी आपला अभिनय, नृत्य आणि गायन या कला दाखवल्या. त्यानंतर अनेक व्हिडिओजही सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता बऱ्याच वर्षांनंतर रेखा आणि धर्मेंद्र ही सुपरहिट जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.