5 वर्षापासून त्याचं नातं, तरी कुणालाच लागला नाही पत्ता, बॉलीवूडच्या कपलचं अखेर मोठं गुपित समोर
बॉलीवूडमधील रिचा चढ्ढा आणि अली फैजल ही सर्वात लोकप्रिय जोडीपैंकी एक जोडी आहे.
मुंबईः बॉलीवूडमध्ये अनेक सेलिब्रेटी येतात आणि जातात. त्याच्या अफेअर्सच्याही चर्चा रंगतात परंतु फार काहीच सेलिब्रेटी कपल्स असतात ज्यांच्या अफेअर्सचा थांगपत्ताही नसतो पण ते रिलेशनशिप असतात. फार उशीरानेच धक्का बसल्यासारखे त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या अफेअरबद्दल कळते.
बॉलीवूडमधील रिचा चढ्ढा आणि अली फैजल ही सर्वात लोकप्रिय जोडीपैंकी एक जोडी आहे. रिचा चड्ढा आणि अली फैजल हे कपल गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चांमुळे चर्चेत आहे. सप्टेंबरमध्ये त्या दोघांचे लग्न होणार असल्याची बातमी येत आहे. अली आणि रिचा याच वर्षी सप्टेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याच्या गुड न्यूजवर त्यांच्या चाहत्यांनी शिक्कामोर्तबही केला आहे.
त्या दोघांचे लग्न मागच्याच वर्षी होणार होते परंतु करोनामुळे ते 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आले. हे दोन्ही बॉलिवूड स्टार्स त्यांच्या आगामी 'फुक्रे 3' चित्रपटाच्या शूटिंगमधून ब्रेक घेणार आहेत आणि लगेगच लग्न करणार आहेत. त्याची लव्हस्टोरी कशी सुरू झाली याबद्दल अनेकांना कल्पना नाही याचे कारण ते एकमेकांना डेट करत असल्याची बातमी फारच जुनी असली तरी यापुर्वी जवळपास पाच वर्षे त्यांनी आपले नाते लपून ठेवले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार रिचाने अलीला प्रपोज केले होते. त्याच्या तीन महिन्यांनंतर अलीने त्याचा निर्णय रिचाला कळवला होता.
रिचा आणि अली पहिल्यांदाच 'फुक्रे' चित्रपटाच्या सेटवर भेटले होते आणि तिथूनच त्या दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. या जोडप्याने जवळजवळ 5 वर्षे त्यांचे नाते लपून ठेवले. दोघं सध्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जाते आहे. गेल्या वर्षी ते दोघं आपल्या नवीन घरातही शिफ्ट झाले आहेत.
रिचा चढ्ढा आणि अली फजल या वर्षी सप्टेंबर महिन्यात लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाची दोन फंक्शन्स असतील. एक फंक्शन मुंबईत तर दुसरे फंक्शन दिल्लीत होईल. रिचा आणि अली त्यांचे लग्न पूर्णपणे खाजगी ठेवणार आहेत ज्यामध्ये कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त काही जवळचे नातेवाईक असतील.
अली 'खुफिया', 'बाओन्रे', 'हॅपी अब भाग जायेगी' आणि हॉलिवूड चित्रपट 'कंधार'मध्येही दिसणार आहे. रिचा सध्या 'अभी तो पार्टी शुरू हुई है' या चित्रपटात काम करत आहे. ते दोघे मिळून 'गर्ल्स विल बी गर्ल्स' नावाचा चित्रपटही तयार करत आहेत.