मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या प्रसंगांचा उलगडा करत असतात. आगामी चित्रपटापासून ते नव्या लूकपर्यंत, प्रत्येक गोष्टीमध्ये चाहत्यांचा सहभाग नोंदवत ही मंडळी त्यांच्या दैनंदिन जीवनाची झलकच जणू सर्वांपर्यंत आणतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटो, व्हिडिओ अशा या गर्दीच्या अनोख्या विश्वात सध्या एका रोखलेल्या नजरेने सारेच घायाळ झाले आहेत. काजळ भरलेले, नजरेत दाह असलेले डोळे, चेहऱ्यावरील शून्यात नेणारे तरीही काळजाचं पाणी करणारे भाव, असं एकंदर या सौंदर्यवतीचं रुप. काही कल्पना लागतेय का ही आहे तरी कोण? 


तर..... ही अभिनेत्री आहे, रिचा चड्ढा. चौकटीबाहेरच्या भूमिकांना न्याय देण्यासाठी म्हणून ओळखली जाणारी रिचा सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टच्या तयारीत आहे. ज्याचीच एक झलक तिने चाहत्यांच्या भेटीला आणली आहे. 


वाचा : चित्रपटाच्या सेटवर कतरिनावर केर काढण्याची वेळ


रिचाने इन्स्टाग्रामवर हे फोटो अशा पद्धतीने शेअर केले आहेत, ज्यामध्ये हे फोटो काही भागांमध्ये पोस्ट करण्यात आले आहेत. जे रिचाच्या प्रोफाईलवर गेलं असता एका संपूर्म फोटोच्या रुपात दिसत आहेत. रिचाचा हा लूक, आणि सुरेख अशी अदा पाहता तिच्या आगामी प्रोजेक्टविषयी कलाविश्व आणि चाहत्यांच्या वर्तुळात उत्सुकता पाहायला मिळत आहे. 




रिचा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या 'पंगा' या चित्रपटातून झळकली होती. अभिनेत्री कंगना रानौत हिची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटातून रिचाने साकारलेल्या पात्रालाही प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. येत्या काळातही रिचा अशाच काही अफलातून आणि प्रभावी भूमिका साकारण्याची चिन्हं आहेत. अभिनेता अली फजल याच्यासोबतच्या रिलेशनशिपमुळेही रिचा कायम चर्चेत असते.