`पुरुषांना काय झालंय, बायकोला छोटे कपडे घालून...`, अध्यात्म स्विकारणारी अभिनेत्री सना खान काय म्हणते पाहा
बॉलिवूड अभिनेत्री सना खानने (Sana Khan) आपल्या पत्नींना तोकडे कपडे घालण्याची परवानगी देणाऱ्या पुरुषांबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. प्रत्येक पुरुषाला आपल्या पत्नीने नम्र दिसतील असे कपडे घालावेत अशी इच्छा असते असं सांगितलं आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सना खानने (Sana Khan) आपल्या पत्नींना तोकडे कपडे घालण्याची परवानगी देणाऱ्या पुरुषांबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. प्रत्येक पुरुषाला आपल्या पत्नीने नम्र दिसतील असे कपडे घालावेत अशी इच्छा असते असं सांगितलं आहे. सना खानने एंटरटेनमेंट इंडस्ट्री सोडलू असून अध्यात्मिक मार्ग स्विकारला आहे. नुकतंच तिने एका पॉडकास्टला हजेरी लावली. यावेळी तिने आपली मतं मांडली.
नुकतंच आई झालेल्या सना खानने यावेळी सांगितलं की, "प्रत्येक व्यक्तीला आपल्या पत्नीने नम्र, साधं राहावं असं वाटत असतं, हो की नाही?. मी अनेकदा अशा पुरुषांना पाहते जे आपल्या पत्नींना छोटे, तोकडे कपडे घालून आपल्यासोबत बाहेर घेऊन जातात. मला हे पाहून फार आश्चर्य वाटतं. तुम्ही कसं काय हे करु शकता? आणि तुम्हाला याचा अभिमान वाटतो आणि म्हणता, 'माझी पत्नी किती हॉट दिसत आहे'. एक अनोळखी मुलगाही तुम्हाला तुमची पत्नी हॉट असल्याचं सांगतो. खासकरुन जेव्हा पत्नीने छोटे कपडे घातलेले असतात".
पुढे ती म्हणाली की, "तुम्हाला याचा अभिमान वाटतोय का? तुम्हाला काहीतरी स्वाभिमान असायला हवा. ती तुमची पत्नी आहे. 2019 मध्ये मला मी आता या सर्व गोष्टींचा निरोप घेणार असल्याची कल्पना आली होती. त्यावेळी मी सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या आयुष्यात फार चुकीच्या गोष्टी करत होती. मला वाटत होतं लोक माझ्या सोशल मीडियावर जे पाहत आहेत ते मी खऱ्या आयुष्यात नाही. मी काही ठरविक पद्धतीचे कपड परिधान करत होती, डान्स करत होती. मी तरुणांची दिशाभूल करत होती असं मला वाटत होतं".
याच मुलाखतीत 36 वर्षीय सना खानने 'शैतान' होता ज्याने तिला साधेपणापेक्षा "आधुनिकता" निवडण्यास मला भाग पाडलं आणि सलवार-कमीजच्या तुलनेत स्लिव्हलेस परिधान केलं.
सनाने नोव्हेंबर 2020 मध्ये निकाह समारंभात मुस्लिम विद्वान आणि व्यापारी अनस सय्यद याच्याशी लग्न केले. या जोडप्याने 2023 मध्ये एका मुलाचं स्वागत केले आणि त्याचं नाव सय्यद तारिक जमील ठेवले. एकत्रितपणे, ते अनेक व्यवसाय चालवतात आणि इस्लामच्या शिकवणींचा प्रसार करतात.