मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सना खान लग्नानंतर पती अनस मुफ्तीसोबत आयुष्य एन्जॉय करतेय. पतीसोबत सना खान सध्या सुट्टीवर गेली आहे. या दरम्यान सना पतीसोबत मजा-मस्ती करताना दिसतेय. या सर्व गोष्टींची माहिती ती आपल्या इन्टाग्रामवरून चाहत्यांना देत असते. आता सनाने एक व्हिडिओ शेअर केला आहे.  या व्हिडिओत बेडरूमचा दरवाजा उघडताच सना ओरडताना दिसतोय. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सना खान अभिनय सोडून धर्माच्या मार्गावर गेली आहे. मात्र ती सोशल मीडियावर चाहत्यांशी कनेक्ट असते. सना तिचे विविध फोटो, व्हिडिओ इन्टाग्रामवर शेअर करत असते. असाच एक व्हिडिओ तिने शेअर केला आहे.  


सनाने शेअर केलेल्या व्हिडिओ पाहिला असता, हे स्पष्ट होते की सना एका भव्य ठिकाणी गेली आहे. या व्हिडिओमध्ये हॉटेलचा शाही आदरातिथ्य पाहून खुद्द सनाही हैराण झाली आहे. सनाने बेडरूमचा दरवाजा उघडताच, ती स्वत: येथील सजावट पाहून थक्क झालेली दिसते आणि ती आनंदाने 'माशाअल्लाह' ओरडताना दिसते. तिचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 


दरम्यान सना खानने 'बिग बॉस 6' व्यतिरिक्त 'जय हो', 'टॉयलेट - एक प्रेम कथा' आणि 'वजा तुम हो' सारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.