मुंबई : जीवनात काही गोष्टी या अमुक एक व्यात मिळाल्याचं पाहिजेत असं स्वप्न अनेकजण पाहतात. या स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी प्रचंड मेहनतही घेतात. सरतेशेवटी एक दिवस ही मेहनत फळते. तिही अशी की इतरांनाही याचा हेवा वाटावा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशीच मेहनत फळली आहे अभिनेता आमिर खान याच्या मुलीची. ती नावारुपास आली आणि पाहका पाहता तिनं स्वत:चं नवं आणि आलिशान घरंच खरेदी केलं. मुंबईतील अतिशय आलिशान वस्तीत तिचं हे घर आहे. ज्याची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे.


आता तुम्ही म्हणाल आमिरची लेक वयानं इतकी लहान असून, हे कोट्यवधींचं घर घेणं तिला शक्य तरी कसं झालं?


तर, आमिरची  ही लेक म्हणजे ‘दंगल’ चित्रपटात त्याच्या मुलीच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री सान्या मल्होत्रा. सान्यानं तिच्या कारकिर्दीतील यशाच्या बळावर मुंबईच्या जुहू- वर्सोवा लिंक रोड परिसरात असणाऱ्या बेव्ह्यू या इमारतीत एक घर खरेदी केलं आहे.


समीर भोजवानीच्या नावावर असणारी ही मालमत्ता आता सान्याच्या नावे झाली आहे. ज्याची किंमत जवळपास 14.3 ते 14.7 कोटींच्या घरात असल्याचं सांगितलं जात आहे.


अभिनेता आणि बॉलिवूडचा ग्रीक गॉड म्हणून ओळख असणाऱ्या हृतिक रोशन याचेही दोन फ्लॅट या इमारतीत आहेत. त्यामुळं एका अर्थी तो सान्याचा शेजारीच झाला.



दरम्यान, या घरासाठी सान्यानं तिच्या वडिलांसह 71 लाखांची स्टॅम्प ड्यूटी भरली आहे. सान्यानं दिवाळीच्याच मोक्यावर घेतलेलं हे घर पाहता यंदाचं वर्ष तिच्यासाठी अधिक खास आहे, असं म्हणायला हरकत नाही.