Sara Ali Khan: कपाळावर चंदन, डोक्यावर ओढणी; महादेवाचं दर्शन घेतल्यानं सारा अली खान ट्रोल का झाली?
Sara Ali Khan Trolled: सारा अली खाननं ठिकठिकाणच्या शिवमंदिरांना दिलेल्या भेटीचे आणि दर्शनाचे फोटोज इन्टाग्रामवर शेअर केले होते आणि तिनं सगळ्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या होत्या.परंतु या फोटोंमुळे सारा अली खान प्रचंड ट्रोल झाली आहे.
Sara Ali Khan Trolled: अभिनेत्री सारा अली खान अनेकदा ट्रोल झाली आहे. आता पुन्हा एकदा सारा अली खान ट्रोलिंगची (Sara Ali Khan Trolling) शिकार झाली. गणपतीची पुजा केल्यानंतर आता महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवमंदिरात पोहचलेली (Sara Ali Khan Mahashivratri) सारा अली ट्रोल झाली असून सध्या तिचे फोटोज हे व्हायरल होत आहेत. काल संपुर्ण भारतात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी यावेळी महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपल्या सोशल मीडिया अकांऊटवरून फोटोजही शेअर केले आहेत. लोकप्रिय अभिनेत्री सारा अली खानंही महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपले शिवमंदिरातील काही फोटोज इन्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या चाहत्यांनी या फोटोंना लाईकही केले आहे. परंतु यावेळी ट्रोलर्सनही सारा अली खानला (Sara Ali Khan Photos) ट्रोल केले आहे. पण नक्की सारा अली खान ट्रोल का बरं झाली? (bollywood actress sara ali khan gets trolled on posting photos of taking darshan at shiv mandir on the occasion of mahashivratri)
सारा अली खाननं ठिकठिकाणच्या शिवमंदिरांना दिलेल्या भेटीचे आणि दर्शनाचे फोटोज इन्टाग्रामवर शेअर केले होते आणि तिनं सगळ्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या होत्या.परंतु या फोटोंमुळे सारा अली खान प्रचंड ट्रोल झाली आहे. यापुर्वीही सारा अली खान गणपतीची पूजा करताना दिसली होती तेव्हाही तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा सारा अली खान महाशिवरात्रीचे फोटो पोस्ट केल्यानं ट्रोल झाली आहे. तिनं कॅप्शनमध्ये 'जय भोलनाथ' (Jai Bholenath) लिहित शुभेच्छा दिल्या आहेत.
पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये सारा अली खान ही कपाळावर चंदन आणि डोक्यावर ओढणी परिधान करताना दिसली, परंतु तिचे हे रूप काही नेटकऱ्यांना आवडले नसून यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. सारा अली खानच्या या फोटोंवर कमेंट करत अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. एका युजरने लिहिलं, “मुस्लिम असूनही तू मंदिरात जातेस. तुला लाज वाटली पाहिजे.” दुसऱ्या एका युजरने लिहिलं, “मूर्ती पूजा इस्लाममध्ये हरम मानली जाते.” तर आणखी एका युजरने, “तू फक्त नावानेच मुस्लिम आहेस. तुला अनफॉलो करत आहे.” अशी कमेंट केली आहे. दरम्यान काही युजर्सनी मात्र आई- वडिलांच्या दोन्ही धर्मांना समानतेने मानणाऱ्या साराचं कौतुकही केलं आहे.
सारा अली खान ही अभिनेता सैफ अली खान आण त्याची पहिली पत्नी अमृता सिंग यांची मोठी मुलगी आहे. सारानं 2018 साली 'केदारनाथ' (Kedarnath Movie) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. त्यानंतर तिनं अनेक लोकप्रिय चित्रपट केले आहेत. सारा अली खानचे अख्ख्या जगातून खूप मोठं फॅन फॉलोइंग आहे.