मुंबई : अनेक कलाकार आणि त्यांच्या मिलांना आपल्या चित्रपटांमध्ये स्थान देत, करिअरमध्ये महत्त्वाची संधी देत त्यांना घडवण्याचं काम निर्माता दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) यानं केलं आहे. आजवर त्याच्या चित्रपटांतून अनेक नवोदित चेहऱ्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. करणवर घराणेशाहीच्या मुद्द्यावरून एका वर्गाचा रोष असला, तरीही त्याची पाठराणखण करणारीही अनेक मंडळी आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असा हा ‘केजो’ सध्या त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत बहुधा पहिल्यांदाच एका नवोदित अभिनेत्रीच्या कारनाम्यांना पाहून हैराण झाला आहे. त्यानं सोशल मीडियाच्याच माध्यमातून अशी प्रतिक्रिया दिली आहे. 


ही नवोदित अभिनेत्री एक स्टारकिड असून, तिची खादाडी पाहून करणलाही क्षणार्धासाठी तिच्यावर विश्वास बसेना. शेवटी त्यानं तिचा व्हिडीओ शेअर करत इतरांनाही तिनं नेमकं काय केलं हे दाखवलं आहे. 


करणला आपल्या खादाडीनं हादरवणारी ही नवोदित अभिनेत्री आहे शनाया कपूर (Shanaya Kapoor). अभिनेता संजय कपूर आणि माहीप कपूर यांची मुलगी शनाया अद्यापही रुपेरी पडद्यावर आलेली नाही. पण, त्यापूर्वीपासूनच तिच्या नावाभोवती प्रसिद्धीचं वलय पाहायला मिळत आहे. 



नुकतंच तिनं एका जाहिरातीसाठी काम केलं असून, यामध्ये ती spaghetti खाताना दिसतेय. एका hair straightening brand साठीच्या या जाहीरातीमध्ये शनायानं जे काही उलटसुलट कारनामे केले आहेत ते पाहूनच करणनं अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.