बॉक्स ऑफिसवर (Box Office) एकीकडे 'स्त्री 2' चित्रपट कमाईचे नवे रेकॉर्ड रचत असताना दुसरीकडे याचा फटका 'वेदा' (Vedaa) चित्रपटाला बसला आहे. जॉन अब्राहम (John Abraham) आणि शर्वरी (Sharvari Wagh) यांच्या प्रमुख भूमिका असणारा वेदा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आहे. मात्र शर्वरी वाघने बॉक्स ऑफिसवरील कामगिरीची आपल्याला फार चिंता नसल्याचं म्हटलं आहे. वेदा चित्रपटासह 'स्त्री 2' आणि अक्षय कुमारचा 'खेल खेल मै' हे दोन चित्रपट रिलीज झाले. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत शर्वरीने, इंडस्ट्रीमधील बिजनेस समजण्यासाठी आपण अद्याप विद्यार्थी असल्याचं म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेदाच्या बॉक्स ऑफिवरील कामगिरीवर शर्वरी म्हणाली, "खरं तर याकडे पाहण्याच्या दोन वेगळ्या पद्धती आहेत. माझ्यासाठी वेदा ह्रदयाच्या फार जवळ होता आणि अभियनही तसाच केला. मला वाटतं चित्रपट चांगल्या मनाने केला होता आणि अगदी योग्य जागी होता. आता व्यावसायिक निर्णयांबद्दल बोलायचं गेल्यास गोष्टी कशा घडतील हे माझ्या हाताबाहेर आहे. कारण हा माझा तिसराच चित्रपट आहे. त्यामुळे मी सध्या फक्त शिकत आहे. गोष्टी कशाप्रकारे रुपांतरित होतात आणि व्यावसायिकदृष्ट्या योग्य काय हे मी अद्याप समजून घेत आहे".


पुढे तिने सांगितलं की, "मला वाटतं ही भूमिका फार कठीण, आव्हानात्मक आणि माझ्या कंफर्ट झोनच्या बाहेर होती. त्यामुळे मला जेव्हा प्रेक्षकांचं प्रेम मिळतं तेव्हा मी समाधानी असते. कारण मी माझ्या अभिनयावर विश्वासाची थोडीशी झेप घेतलेली असतो. हे इतर शंभर मार्गांनी जाऊ शकते. पण योग्य मार्गाने मिळालं हा मोठा विजय आहे. मी ड्रामा केलेला नाही जो फार कठीण आहे. माझ्यासाठी हे मोठं यश आहे".


वेदाने बॉक्स ऑफिसवर दोन आठवड्यांत आतापर्यंत .25 कोटींची कमाई केली आहे. निखिल अडवाणी दिग्दर्शित ॲक्शन चित्रपट वेदा (शर्वरी) तरुण महिलेच्या प्रवासाबद्दल आहे. जी परिस्थितीला आव्हान देण्याचं धाडस दाखवते. तिच्या न्यायासाठीच्या लढ्याला एका माजी सैनिकाचा (जॉन) पाठिंबा मिळतो जी तिची ढाल बनून उभा राहतो.