मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला सिडनी विमानतळावर वर्णद्वेषाचा सामना करावा लागला आहे. खुद्द शिल्पानेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याविषयीची माहिती एका पोस्टद्वारे दिली. या पोस्टद्वारे तिने आपली नाराजी व्यक्त केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फक्त सावळा रंग असल्यामुळे तिला एका विमानतळावरील महिला कर्मचाऱ्याने अत्यंत वाईट वागणूक दिल्याचं शिल्पानं सोशल मीडियावर शेअर केलं. याआधीही तिला  अशाच प्रसंगाचा सामना करावा लागला होता. ॉ


दरम्यान, सोशल मीडियावर केलेल्या पोस्टच्या माध्यमातून तिने संबंधित एअरलाइन्स कंपनीला या प्रकाराची दखल घेण्याची सूचनाही केली आहे.



शिल्पाकडे असणारी बॅग ही जास्त मोठी असल्याचं कारण देत तिला या विमानतळावर अपमानास्पद वागणूक देण्यात आली. ज्यानंतर तिने या बॅगचा फोटो पोस्ट करत ती
बॅग खरंच मोठी वाटत आहे का? असा प्रश्नही उपस्थित केला. 


फक्त रंग सावळा असल्यामुळे ही वागणूक मिळाल्याचा शिल्पाने आरोप केला आहे. याआधी २००७ मध्ये बिग ब्रदर या रिअॅलिटी शोमध्ये सावळ्या रंगामुळे काही प्रतिस्पर्ध्यांनी तिला अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली होती.