मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही 2007 मध्ये अशा एका प्रसंगाला सामोरी गेली होती, ज्याची चर्चा आजपर्यंत सुरुच आहे. किंबहुना Kiss चा मुद्दा जोपर्यंत चर्चेत येईल तेव्हा प्रत्येक वेळी शिल्पाचा आणि तिच्या त्या विचित्र किसचा उल्लेख होईल असं म्हणायला हरकत नाही. (shilpa shetty kissed by richard gereViral )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका कार्यक्रमामध्ये हॉलिवूड स्टार रिचर्ड गेरेही सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी शिल्पाला भर कार्यक्रमात किस केलं होतं. ज्यानंतर शिल्पाविरोधात तक्रार दाखल केली. 


जवळपास 15 वर्षांनंतर शिल्पाला अश्लीलता आणि अभ्रदपणाच्या गंभीर आरोपांतून न्यायालयानं मुक्त केलं. 


मेट्रोपॉलिटन मेजिस्ट्रेट केतकी छवन यांनी शिल्पाला इथे पीडिता म्हणून दर्शवलं. त्यांनी सांगितल्यानुसार शिल्पा इथं रिचर्ड यांच्यासाठी एका वस्तूसारखी होती. 


ज्यानंतर शिल्पावर लावलेल्या आरोपांची पडताळणी करत तिच्यावरील आरोप निराधार असल्याचा मुद्दा इथं मांडण्यात आला. 



मुंडावर राजस्थानमधील मॅजिस्ट्रेट प्रथम श्रेणीमध्येही तिच्या आणि रिचर्डविरोधात तक्रार दाखल कराण्यात आली होती. शिवाय दोघांविरोधात एफआयआरचीही मागणी करण्यात आली होती. 


2017 मध्ये हे प्रकरण सर्वोच्च न्यायालआनं मुंबईकडे सुपूर्द केलं ज्यानंतर यावर सुनावणी करण्यात आली. 


दरम्यान, शिल्पाकडून देण्यात आलेल्या निवेदनात आपण रिचर्डकडून करण्यात आलेल्या किसचा विरोध केला नाही, ज्यामुळं असा अर्थ नाही होत की मी या कटकारस्थानाचा किंवा अपराधाचा भाग आहे.