Celina Jaitly On Kolkata Rape Case : संपूर्ण देशात यावेळी कोलकानाच्या आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला ट्रेनी डॉक्टरसोबत घडलेल्या घटनेची चर्चा सुरु आहे. डॉक्टरवर आधी बलात्कार करत तिची निर्घण हत्या करण्यात आली. या सगळ्या प्रसंगानंतर सोशल मीडियावर आणि इतर ठिकाणी देखील सगळे संताप व्यक्त करताना दिसत आहेत. या घटनेनंतर पुन्हा एकदा लोकांना निर्भया हत्याकांडची आठवण झाली. इतकंच नाही तर महिलांच्या सुरक्षेवर देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. सगेळेच सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटलीनं स्वत: विषयी एक धक्कादायक खुलासा केला आहे. सेलिना जेटलीनं तिच्यासोबत लहानपणी घडलेल्या घटनेविषयी सांगितलं आहे. त्या घटनेनंतर अनेक वर्ष सेलिना स्वत: ला दोषी मानत होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेलिना जेटलीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या लहानपणीचे फोटो शेअर करण्यासाठी एक मोठी पोस्ट शेअर केली आहे. यात सेलिनानं तिच्यासोबत घडलेल्या घटनेविषयी सांगितलं आहे. सेलिनानं लिहिलं की 'पीडित नेहमीच दोषी ठरवले जाता. या फोटोक मी 6 वीत होते, जेव्हा जवळच्या एका युनिव्हर्सिटीचा मुलगा माझ्या शाळेच्या बाहेर माझी प्रतीक्षा करत होता. ते रोज शाळेच्या रिक्षाचा पाठलाग करत घरापर्यंत येऊ लागले होते. मी त्यांच्याकडे पाहिलंच नाही असं नाटक करु लागले आणि काही दिवसांनंतर त्यामुळेच माझं लक्ष वेधून घेण्यासाठी भररस्त्यात माझ्यावर दगड फेकण्यास सुरुवात केली. तर तिथून येणाऱ्या जाणाऱ्या कोणाचेही लक्ष गेले नाही.' 



सेलिनानं पुढे लिहिलं की 'मला एका शिक्षकानं सांगितलं की हे सगळं यामुळे झालं कारण मी मॉर्डन होती आणि सैल कपडे मी परिधान करायची नाही आणि इतकंच नाही तर तेल लावून दोन वेण्या घालत नव्हती. त्यामुळे सगळी चूक ही माझी होती!' हे सगळं तेव्हाच झालं जेव्हा एका पुरुषानं सकाळी मी शाळेच्या रिक्षाची प्रतीक्षा करत होते तेव्हा मला त्याचं गुप्तांग दाखवलं. अनेक वर्ष या घटनेसाठी मी स्वत: ला जबाबदार ठरवलं आणि माझ्या मनात शिक्षकांचे ते शब्द घर करून बसले होते आणि मी सतत बोलायचे की माझी चूक आहे. कॉलेजमध्ये ज्या मुलांनी मला विचित्र नावं दिली होती आणि मला सतत त्रास द्यायचे अशा मुलांना मी महत्त्व देत नव्हते. त्यामुळे मी 11 वीत असताना त्यांनी माझ्या स्कुटरच्या ब्रेकची वायर कापली. इतकंच नाही तर त्यांनी माझ्या स्कुटरवर काहीही अश्लील लिहून जायचे.'


सेलिनानं पुढे लिहिलं की 'माझ्या पुरुष मित्रांना माझी खूप चिंता होती आणि त्यांनी माझ्या शिक्षकांना ही संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर माझ्या क्लास टीचरनं मला बोलावलं आणि मला सांगितलं की तू एक फॉरवर्ड टाइपची मुलगी दिसते, स्कुटी चालवतेस आणि जीन्स परिधान करून एक्स्ट्रा क्लासमध्ये जातेस आणि त्यात आणखी भर म्हणजे छोटे केस आणि तेही मोकळे सोडून जातेस. त्यामुळे मुलांना वाटतं की तू चांगल्या घरातली मुलगी नाही. तर नेहमीच माझी चूक राहिली आहे. मला आजही तो दिवस आठवतो जेव्हा स्वत:ला वाचवण्यासाठी मी स्कुटीवरून उडी मारली होती. कारण त्या लोकांनी माझ्या स्कुटीच्या ब्रेकच्या वायर कापल्या होत्या. त्यामुळे मला गंभीर दुखापत झाली होती आणि तरी देखील ही माझीच चूक होती. माझ्या स्कुटीचं नुकसान झालं. मी शारिरीक आणि मानसिक दृष्टया दुखावले गेले होते.' 


हेही वाचा : Illogical लॉजिक सांगणारा Viral अध्यात्मिक बाबाला 'बिग बॉस 18'ची ऑफर; लवकरच दिसणार शोमध्ये?


पुढे आपल्या हक्कासाठी उभ राहण्यावर बोलत सेलिना म्हणाली, 'माझे आजोबा हे रिटायर्ड कर्नल होते. ते म्हातारपणी आपल्या देशासाठी युद्ध करत होते आणि त्यात ते मला शाळेत सोडू लागले आणि घ्यायला येऊ लागले. मला आजही ती मुलं आठवण आहेत, ज्यांनी माझा पाठलाग केला आणि माझ्या स्कूटीचं नुकसान केलं. त्यांनी माझ्या कर्नल आजोबांवर अपमानास्पद टीका केली आणि त्यांची मस्करी केली. आजोबा उभे राहून त्यांना रागात पाहू लागले आणि मग त्यांना त्यांची मान हलवली आणि त्यांचा चेहरा पाहून मला कळत होतं काय झालं आणि ते माझ्यासोबत तिथून निघाले. ज्यांच्यासाठी त्यांनी त्यांच्या जिवाचा विचार केला नाही आता त्यांच्या मनात अशाच लोकांविषयी घृणा होती. आता कोणालाही न घाबरता आपल्या अधिकारांची रक्षा करण्यासाठी मागणी करण्याची वेळ आली आहे. आम्ही दोषी नाही.' खरंतर सेलिनाच्या या पोस्टवर नेटकरी कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.