Stree 3 : श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या 'स्त्री 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. दिग्दर्शक अमर कौशिक यांच्या या हॉरर आणि कॉमेडी चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. चित्रपटाने अनेक आठवडे मोठ्या पडद्यावर प्रवास केला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 800 कोटींहून अधिक कमाई केली आहे. आता हा चित्रपट OTT वर धुमाकूळ घालण्यासाठी येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'स्त्री 2' हा चित्रपट 2018 च्या हॉरर आणि कॉमेडी चित्रपट 'स्त्री'चा सिक्वेल आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 


लवकरच 'स्त्री 3' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार 


द इंडियन एक्स्प्रेसच्या स्क्रीन मॅगझिनच्या अनावरण सोहळ्याला बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने हजेरी लावली होती. यावेळी श्रद्धा कपूरने 'स्त्री 3' चित्रपटासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. 'स्त्री 3' बद्दल श्रद्धा कपूरला विचारले असता ती म्हणाली की, स्त्रीचे दिग्दर्शक अमर सर मला म्हणाले की 'स्त्री 3'च्या चित्रपटासाठी कथा मिळाली आहे. त्यामुळे मी स्वत: चित्रपटाची कथा ऐकण्यास उत्सुक आहे. काही तरी भन्नाट आहे. यामुळे मी देखील 'स्त्री 3' साठी प्रचंड उत्सुक आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अभिनेत्री श्रद्धा कपूरचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. ती नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. चाहत्यांसाठी नेहमी ती वेगवेगळ्या लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. बॉलिवूडमध्ये अभिनेत्रीने अनेक हिट चित्रपट दिले आहेत.


स्त्री 2 ला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद


तिच्या 'स्त्री 2' चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे. त्यामुळे आता 'स्त्री 3' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रेक्षकांनी 'स्त्री 2' ला भरपूर प्रतिसाद दिला आहे. चित्रपट पाहण्यासाठी थिएटरबाहेर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. 'स्त्री 2' चित्रपटासोबत यामधील गाणी देखील प्रचंड हिट झाली. सोशल मीडियावर या गाण्यावर मोठ्या प्रमाणात रील्स व्हिडीओ देखील तयार करण्यात आले आहेत. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.