मुंबई : कॅन्सर या दुर्धर आजाराशी दोन हात करणाऱ्या अभिनेत्री सोनालीने नेहमीच तिच्या आजारपणाच्या दिवसांमध्येही कायमत एक सकारात्मक दृष्टीकोन ठेवला. परदेसात उपचार घेण्यापासून ते मायदेशी परतण्यापर्यंत प्रत्येक वेळी तिनी अनेकांनाच आपल्या आयुष्याच्या या टप्प्यातही कसं उत्स्फूर्तपणे जगायचं याची सिकवण दिली. अशी ही सोनाली आता तिच्या आयुष्यातील एक महत्त्वाचं वास्तव सर्वामसमोर आणलं आहे. हे वास्तव पाहता आता सोनालीच्या जगण्याच्या कक्षा रंदावल्या असून, या नव्या संकल्पना आहेत तरी काय, हे तिचा फोटो पाहतानाच लक्षात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटोसोबतच्या कॅप्शनमधूनही तिने या लूकविषयी आणि फोटोविषयी माहिती दिली. आहे. वोग या मासिकासाठीच्या फोटोशूटमधील फोटो पोस्ट करत तिने लिहिलं, 'ही कल्पनाच किती विसंगत आहे. मेकअप आणि केसांविना, त्यातही शस्त्रक्रियेचा इतका मोठा व्रण ... हे सारे वोगच्या फोटोशूटसाठीचे निकष कधीच नव्हते. पण, माझ्यमते हे माझ्यासाठी आता सर्वसामान्य आहे', असं म्हणत तिने आपल्या शरीराशी असलेलं एक वेगळं नातं मोठ्या धाडसाने सर्वांसमोर ठेवलं. कॅन्सरच्या आजाराला लढा देत त्यातून सावरणाऱ्या सोनालीने तिच्या शरीरावर असणाऱ्या व्रणाकडेही एका सौंदर्यपूर्ण दृष्टीने  पाहत हे वास्तव सर्वांसमोर आणलं. मुख्य म्हणजे या फोटोशूटच्या वेळी आपल्याला तयार होण्यासाठी आधीपेक्षा अगदी कमी वेळ लागल्याचंही तिने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं. 



सोनालीने लिहिलेली ही पोस्ट वाचताना खरंच तिच्या या धाडसाचं कौतुक करावं तितकं कमी अशीच प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. २०१८ मध्ये तिने आपल्याला कॅन्सर झाल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं होतं. त्यानंतर कलाविश्वापासून ती दूरही राहिली. परदेशात उपचार घेतल्यानंतर काही दिवसापूर्वीच ती भारतात परतली. सोनालीच्या परतण्याने आणि तिच्या प्रकृतीत दिवसेंदिवस होणाऱ्या सुधारणांमुळे चाहत्यांमध्ये आणि कलाविश्वातील तिच्या मित्रपरिवारातही आनंदाचं वातावरण आहे.