`या` अभिनेत्रीचं गरोदरपणातील सौंदर्य पाहून म्हणाल, Uff तेरी अदा...
पुरेसा आनंद आणि आपल्या लोकांची साथ इतकंच काय ते रुपाला आणखी उठावदार करुन जातं.
मुंबई : असं म्हणतात की, गरोदरपणात कोणत्याही महिलेच्या सौंदर्यात आणखी भर असते. कारण हे गरोदरपणातील सौंदर्य तिच्या चेहऱ्यावर झळकत असतं. एका नव्या जीवाला आपण या पृथ्वीवर आणणार हीच भावना या सौंदर्यात दरप दिवशी नव्यानं भर टाकत असते.
या काळात कोणत्या इतर कारणाची सौंदर्य वाढवण्यासाठी गरजच भासत नाही. कारण पुरेसा आनंद आणि आपल्या लोकांची साथ इतकंच काय ते रुपाला आणखी उठावदार करुन जातं.
सध्या अशाच एका अभिनेत्रीनं तिच्या गरोदरपणातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये ती शब्दांतही मांडता येणार नाही इतकी सुंदर दिसत आहे.
ही अभिनेत्री म्हणजे सोनम कपूर. काही दिवसांपूर्वीच सोनमनं तिच्या गरोदरपणाची बातमी दिली आणि चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. (Sonam Kapoor )
हे सर्व होत असतानाच आता सोनमनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले. गरोदरपणातील नूर नेमका काय असतो हेच तिचे हे नवे फोटो पाहताना लक्षात येत आहे.
सोनमचा हा लूक पाहताना तिनं इंडोवेस्टर्न आऊटफिटला पसंती दिल्याचं लक्षात येत आहे. इतकंच नव्हे तर, तिनं मिनिमल मेकअप ठेवत आपल्या नैसर्गिक सौंदर्याच्या बळावर हा लूक निभावल्याचं पाहायला मिळत आहे.
सोनमचे हे फोटो पाहताना त्यावर अनेकांनीच कमेंट करत ती किती सुंदर दिसतेय याबाबतच्या प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं.
सोनमकडे पाहताना गरोदरपणातही तिनं स्वत:ची घेतलेली काळजी आणि त्यातच न सोडलेला तिचा फॅशनिस्ताचा टॅग कौतुकास्पद आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.