मुंबई: संपूर्ण कलाविश्वात आणि सोशल मीडियावरही सध्या सर्वत्र #MeToo च्याच चर्चा सुरु आहेत. यातच काही अभिनेत्रींनी पुढे येत त्यांच्यासोबत घडलेल्या प्रसंगांविषयीसुद्धा उघडपणे बोलण्यास सुरुवात केली आहे. अशाच अभिवनेत्रींपैकी एक म्हणजे बी- टाऊनची 'क्वीन' म्हणून ओळखली जाणारी कंगना रणौत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगना रणौतने दिग्दर्शक विकास बहलने कशा प्रकारे आपल्याशी चुकीच्या पद्धीतने वर्तन करत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता आणि आपण त्या प्रसंगाचा कशा प्रकारे सामना केला होता, ही बाब उघड केली. 


तिच्या या वक्तव्यावर विश्वास ठेवणं, तसं कठीणच असल्याची प्रतिक्रिया अभिनेतच्री सोनम कपूरने एका कार्यक्रमादरम्यान दिली. सोनमची ही प्रतिक्रिया ऐकून अनेकांच्याच भुवया उंचावल्य़ा. 


खुद्द कंगनालाही तिची ही भूमिका रुचली नसून कंगनाने तीव्र शब्दांणध्ये या प्रकरणी नाराजी व्यक्त केली. 


आपण वडिलांच्या प्रसिद्धीचा फायदा न घेता जवळपास दहा वर्षांच्या संघर्षानंतर या कलाविश्वात हे स्थान मिळवलं आहे, अस म्हणत कंगनाने सोनमला सुनावलं. 


कंगनाचे हे बोल बहुधा सोनमच्या जिव्हारी लागले असावेत, हे तिने या सर्व प्रकारानंतर लिहिलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमधून पाहायला मिळत आहे. 


'स्ट्राँगर टुगेदर...' असा फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून, त्यासोबतच्या कॅप्शनमधून तिने काही गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. 



माध्यमांनी आपलं म्हणणं चुकीच्या पद्धतीने सर्वांपर्यंत पोहोचवत समोरच्या व्यक्तीला भडकवल्याचा दावा तिने केला. त्यासोबतच आपण ज्या वर्तुळातून आलो आहोत त्य़ाचा मला अभिमान आहे, इतरांनाही तो असावा हेसुद्धा तिने तितक्याच ठामपणे लिहिलं. 


सध्याच्या घडीला एकंदर परिस्थिती पाहता आपण सर्वच महिलांनी एकजुटीने उभं राहण्याची गरज असल्याचच ती या पोस्टमधून म्हणाली आहे. सोनमची ही पोस्ट आणि एक प्रकारे तिने केलेलं भावनिक आव्हान पाहता कंगना यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.