मुंबई : आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालणारी बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी सध्या स्वतःच्याच बायोपिकच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिच्या बायोपिकचे नाव आहे 'करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोन.' या सिनेमातून सनी लियोनी आपल्या आयुष्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टींचा उलघडा करणार आहे. या दरम्यान सनीने एक फोटो शेअर केला आहे. या सिनेमाचे शूटिंग साऊथ आफ्रिकेत सुरु आहे. या शूटिंग दरम्यानचा क्लिपबोर्ड सहीत एक फोटो सनीने सोशल मीडियावर शेअर केला. आयुष्यातील त्या निर्णयाबद्दल अपराधी वाटत असल्याचे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. बॉलिवूडमध्ये पर्दापण करण्यापूर्वी ती एक प्रसिद्ध पार्नस्टार होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनीचे हे छोटेसे कॅप्शन खूप काही सांगते. आता तिच्या या बायोपिकबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.



'करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोन' या बायोपिकमधून सनी लियोनीचा लहानपणापासून ते पॉर्न इंडस्ट्री आणि त्यानंतर बॉलिवूडपर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. सनी तिचा जीवनप्रवास वेब सिरीजद्वारा दाखवू इच्छिते. 'करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोन' OTT (over-the-top) प्लेटफार्म ZEE5 प्रसारित करण्यात येईल.