...म्हणून सनीने पोस्ट केला `हा` फोटो
संपूर्ण कुटुंबासोबत असण्याचा आनंद सनीच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.
मुंबई : 'बेबी डॉल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सनी लिओनी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्याही ती अशाच एका कारणामुळे चर्चेत आली आहे. सनी तिच्या कुटुंबाचे, मुलांचे आणि मुलगी निशा हिचे फोटो नेहमीच शेअर करत असते. पण, आता तिने पोस्ट केलेला हा फोटो खास आहे.
एका सणाच्या निमित्ताने सनीने आपल्या संपूर्ण कुटुंबासोबतचा एक सुरेख असा फोटो पोस्ट करत सर्वांनाच #FamliyGoals दिले आहेत. या फोटोमध्ये तिचं संपूर्ण कुटुंब हे एकसारखेच कपडे घातल्याचं पाहायला मिळत आहे.
सनीने हा फोटो पोस्ट करत ज्यू धर्मातील एका सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'हनुका', असं त्या सणाचं नाव आहे. 'Happy Hanukkah Everyone!! Love the Weber’s!!!!! Hehe', असं तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं.
संपूर्ण कुटुंबासोबत असण्याचा आनंद सनीच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये तिच्या तिन्ही मुलांवरही चाहत्यांच्या नजरा खिळत आहेत. निशा, अॅशर सिंग वेबर आणि नोआ सिंग वेबर यांच्यामुळे सनी आणि डॅनिअलच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाल्याचं गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळालं आहे. त्याचीच झलक या फोटोमध्येही दिसत आहे.
हनुका म्हणजे काय?
हनुका हा ज्यू धर्मियांचा एक महत्त्वाचा सण आहे. जवळपास आठ दिवस या सणाचा उत्साह असतो. सनीचा पती डॅनिअल वेबर हा ज्यू असल्यामुळे सध्या तिचं संपूर्ण कुटुंब हा सण साजरा करत आहे.