मुंबई : नाही तिला तिच्या भूतकाळाची पर्वा ना ही लोकांच्या चर्चेची पर्वा, ती आजपण जगतेय आणि येत्या उद्यासाठीही. आम्ही बोलत आहोत पॉर्न स्टर आणि अभिनेत्री सनी लिओनीबद्दल, जिने पॉर्न मुव्हीपासुन बॉलिवूडमध्ये स्थान मिळवलं. जाणून घेऊया तिची कथा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करणजीत वोहरा लहानपणी होती टॉमबॉय
करणजित हे नाव सनीला खूप आवडायचं. एका मुलाखतीत सनीने सांगितले की, ती लहानपणी मुलांसारखीच राहायची. तिचे बरेच फ्रेंन्ड्स मुलं होती आणि ती त्यांच्याबरोबर हॉकी खेळायची. 2008 मध्ये तिच्या आईचा अचानक मृत्यू झाला. मग संपूर्ण कुटुंब कॅनडाला शिफ्ट झालं


कॅनडाला भेट गेल्यानंतर बेकरीमध्ये केलं काम
सनीने एका मुलाखतीत सांगितले होतं की, पॉर्न चित्रपट निवडणं तिच्यासाठी सोपं नव्हतं. तिचं स्वप्न कॅनडाला जाऊन नर्स बनण्याचं होते. नर्स म्हणून काम करण्यापूर्वी सनीने जर्मन बेकरीमध्येही काम केलं होतं.


म्हणूनच 'सनी लिओन' हे नाव
पॉर्न चित्रपटात जाण्यापूर्वी जेव्हा सनी तिचं न्यूड फोटोशूट पेंटहाउस मासिकासाठी करत होती, तेव्हा तिचं नाव करणजीत कौर वोहरा असं होतं. या नावा वरुन दिग्दर्शक म्हणाले, 'हे फोटो या या नावाशी अजिबात जुळतं नाही, काहीतरी दुसरं नाव ठेवा'. आता एवढ्या घाईत काय नावं ठेवावं? अशा परिस्थितीत सनीला तिचा भाऊ संदीपची आठवण आली ज्याला प्रेमाने सगळे 'सनी' म्हणत.


अशा प्रकारे करणजीतने लगेचच तिचं नाव सनी असं ठेवलं आणि आता प्रश्न पडतो की लिओनी कुठून आलं? 'सर्जिओ लिओनी' हा इटालियन दिग्दर्शक होता, सनीने त्याच्या आडनावतील 'लिओनी' हे आडनाव जोडले. कारण तो दिग्दर्शकावर सनी खूप प्रभावित झाली होती.



धूमधडाक्यात धाकट्या भावाचं लग्न
सनीच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर तिने नेहमीच आपल्या भावाची काळजी घेतली. तिच्या भावाशी सनीचे नाते मित्रासारखे आहे. ती मनातील प्रत्येक गोष्ट उघडपणे त्याला सांगते. सनीने एका टीव्ही शो दरम्यान सांगितले होते की, तिचा भाऊ संदीपमुळेच, आपल्या कुटुंबाला आपण जे करतोय हे सांगण्याची हिम्मत झाली.