मुंबई: अभिनेत्री सनी लिओनी चित्रपटसृष्टीतील तिच्या कारकिर्दीसोबतच कौटुंबिक आयुष्यावरही लक्ष केंद्रित करत आहे. चित्रपट गीतामंवर ठेका धरुन प्रेक्षकांना घायाळ करणारी बी- टाऊनची ही बेबी डॉल सध्याच्या घडीला अतिशय आनंदात आहे. तिच्या आनंदाचं कारणही तसंच आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनी सध्या तिच्या मुलीचा म्हणजेच निशाचा वाढदिवस साजरा करण्यामध्ये व्यग्र असल्याचं दिसत आहे. 


निशाच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सनी आणि डॅनिअलने सोशल मीडियावर तिच्यासोबकचे काही सुरेख फोटोही पोस्ट केले. 


तुच आमच्या आनंदामागचं खरं कारण आहेस... असं म्हणत डॅनिअलने निशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 


तर, 'तिच्या चेहऱ्यावरील हास्यच सर्वकाही सांगून जात आहे.... मला तिचा फारच गर्व आहे...', असं कॅप्शन लिहित सनीने निशासोबतचा फोटो पोस्ट केला. ज्यामध्ये निशा आणि सनीच्या चेहऱ्यावर असणारं हास्य सर्वकाही सांगून जात आहे. 




सनीने वर्षभरापूर्वी महाराष्ट्राच्या लातूर येथून निशाला दत्तक घेतलं होतं. निशा सनीच्या आयुष्यात आल्यानंतर तिच्या आयुष्यात बरेच बदल झाले. 


सनी नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून निशोसोबतचे फोटो पोस्ट करत असून, आपल्या लाडक्या लेकीला सर्वांच्याच भेटीला आणत असते.