मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि तिचा प्रियकर रोमन शॉल यांच्या नात्यानं कायमच सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. अतिशय सुरेख अशा वळणावर त्यांचं नातं सुरु झालं. ज्यानंतर रोमन सुष्मिताच्याच घरी राहत होता, असंही म्हटलं गेलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहता पाहता या जोडीनं चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला. पण, आता जी माहिती समोर येत आहे ते पाहता सुष्मिता आणि रोमनच्या नात्यात वादळ आल्याचं कळत आहे. 


गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यामध्ये बऱ्याच गोष्टी बिनसल्या आहेत. त्यामध्येच आता म्हणे या दोघांनीही नातं संपवल्याचं म्हटलं जात आहे. 


सध्या सुष्मिताच्या घरातून निघालेला रोमन त्याच्या कोणा एका मित्राच्या घरी राहत असल्याचं कळत आहे. 


काही दिवसांपूर्वी या दोघांच्या लग्नाचं वृत्त समोर आलं होतं. पण, आता मात्र नात्याची खरी बाजू सर्वांसमक्ष आल्यामुळं चाहत्यांना हा धक्काच बसला आहे. 




रोमनला आजवर अनेकदा सुष्मिताच्या कुटुंबासमवेत पाहिलं गेलं आहे. विविध कार्यक्रम असो किंवा एखादी सहल, प्रत्येक वेळी रोमननं सुष्मिता आणि तिच्या कुटुंबाची साथ दिली आहे. 


पण, आता मात्र त्यांच्यात आलेला दुरावा पाहता नेमकं सत्य काय असाच प्रश्न चाहते उपस्थित करु लागले आहेत.