मुंबई : लग्नसराईची धूम यंदाच्या वर्षअखेरीस सुद्धा पाहायला मिळत असून, अगदी या वर्षाला निरोप देत आणखी एका सेलिब्रिटी लग्नाची धूम पाहायला मिळत आहे. 'बाहुबली' या अतिभव्य कलाकृतीचे दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांचा मुलगा म्हणजेच एस.एस. कार्तिकेय याचा हा विवाहसोहळा जयपूरमध्ये आयोजित करण्यात आला असून, संपूर्ण दाक्षिणात्य कलाविश्व त्या ठिकाणी एकवटल्याचं पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रभास, राणा डग्गुबती, राम चरण, ज्युनियर एनटीआर यांच्यासह बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिनेसुद्धा या विवाहसोहळ्यासाठी सहकुटुंब हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. खुद्द सुष्मितानेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या समारंभातील काही फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत. 


सोशल मीडियावर तिने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये कुटुंबासोबतच आणखी एका खास व्यक्तीची साथही सुष्मिताला लाभल्याचं पाहायला मिळत आहे. ती खास व्यक्ती म्हणजे अर्थातच तिचा प्रियकर रॉमन शॉल. 



गेल्या काही काळापासून या नात्याची अधिकृत घोषणा केल्यानंतर सुष्मिता आणि रॉमन बऱ्याच कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता नव्या वर्षात ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकणार का, हे पाहणंही तितकच महत्त्वाचं ठरणार आहे. 





तुर्तास ते ज्या लग्नसोहळ्यासाठी जयपूरला गेले आहेत तेथे सर्वांचाच उत्साह पाहण्याजोगा आहे. कार्तिकेयच्या आयुष्यातील खास दिवसाआधी म्हणजेच त्याच्या विवाहसोहळ्याआधी आयोजित संगीत आणि इतर समारंभांनाही या कलाकारांनी धमाल केली, ज्याचे अनेक व्हिडिओ फॅन पेजवरुन शेअर करण्यात आले आहेत.