मुंबई : अभिनेत्री सुष्मिता सेन हिनं आजपर्यंत कोणाशीही लग्नगाठ बांधलेली नाही. असं असलं तरीही ती दोन मुलींची आई आहे. आत्मविश्वास आणि आपल्या लोकांची साथ यांच्या बळावर सुष्मितानं जीवनात हा टप्पा गाठला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही अभिनेत्री सतत तिच्या जीवनात नेमकं काय सुरु आहे, याची माहिती सर्वांना देत असते. (Sushmita sen baby )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता म्हणे सुष्मिताच्या कुटुंबात आलेल्या नव्या पाहुणीच्या जन्माचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रियता मिळताना दिसत आहे. (Sushmita sen baby video )


आता तुम्ही म्हणाल सुष्मिताच्या मुली, तर दत्तक आहेत. मग त्यांच्या जन्माचा व्हिडीओ कसा ? तर, हा व्हिडीओ आहे सुष्मिताचा भाऊ राजीव सेन याच्या मुलीच्या जन्माचा. 


चारू आणि राजीव त्यांच्या आयुष्यातील अनेक क्षण युट्यूब व्हिडीओंच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला आणत असतात. त्यातच त्यांनी मुलीच्या जन्माच्या क्षणांचा व्हिडीओ सर्वांसाठी आणला आहे. (Rajiv sen Charu Asopa)


व्हिडीओमध्ये चारू, प्रसूतीसाठी रुग्णालयात जाण्याआधी कशी तयारी करत होती हेसुद्धा पाहायला मिळत आहे. तर, प्रसूतीनंतर राजीवचा आनंद त्यानं नेमका कसा व्यक्त केला हे भावनिक क्षणही पाहायला मिळत आहेत. 


साधारण 6 महिन्यांपूर्वी चारू असोपानं एका मुलीला जन्म दिला. अभिनेत्री सुष्मिता सेन हिनंही या गोड क्षणांची माहिती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली होती. 



तिथं चारु आणि राजीवच्या नात्यात मीठाचा खडा पडल्याच्या बातम्या व्हायरल होत होत्या आणि  इथं मात्र मुलीच्या येण्यानं ही जोडी एका नव्या प्रवासाचा आनंद घेत होती. थोडक्यात सोशल मीडियावरच्या चर्चा निव्वळ अफवाच ठरल्या. 


सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या चारूनं मालिकांमध्ये बहुविध भूमिका साकारल्या आहेत. लग्नानंतर मात्र तिनं या नात्यालाच अधिक वेळ दिल्याचं पाहायला मिळालं होतं. तिच्या आणि राजीवच्या नात्याचे हेच गोड क्षण सोशल मीडियावर सातत्यानं पाहता येतात.