पन्नाशीकडे जाणारी सुष्मिता दिवसागणिक होतेय आणखी सुंदर , ग्लॅमरस; कशी ते पाहाच
सुष्मिता काही काळ स्वत:ला वेळ देई अशीच अनेकांना आशा होती
मुंबई : काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सुष्मिता सेन (Susumita sen)हिच्या खासगी जीवनात बऱ्याच गोष्टी घडल्या. रोमन शॉल याच्यासोबतच्या नात्याला तडा गेल्यानंतर सुष्मिता काही काळ स्वत:ला वेळ देई अशीच अनेकांना आशा होती. किंबहुना तसं झालंसुद्धा.
सुष्मितानं नेहमीप्रमाणेच स्वत:कडे लक्ष दिलं आणि तेसुद्धा अशा पद्धतीनं की पाहणारेही अवाक् झाले.
सोशल मीडियावर सुष्मितानं नुकत्याच काही पोस्ट केल्या, ज्यांच्यावर नेटकऱ्यांच्या नजरा खिळल्या.
सुष्मितानं पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ती ब्रालेट आणि मिनी स्कर्ट घातलेली दिसत आहे. लूक पूर्ण करण्यासाठी तिनं मोठ्या ग्लासेस असणारा गॉगलही लावला आहे.
सुष्मिताचा हा लूक पाहून, एखादी वाईन ज्याप्रमाणं अनेक वर्ष ठेवल्यावर तिची चव वाढते, तशीच ही अभिनेत्रीही वाढत्या वयासोबत अधिकच सुंदर आणि ग्लॅमरस दिसू लागलीये अशीच प्रतिक्रिया चाहत्यांनी दिली.
तिच्या फोटोकडे लक्ष देऊन पाहिल्यास बी- टाऊनची ही अभिनेत्री एका सुंदर अशा ठिकाणी असल्याचं लक्षात येत आहे.
व्यायामापासून ते अगदी मानसिक शांततेपर्यंत सर्वच गोष्टींची काळजी सध्या सुष्मिता घेताना दिसतेय.
ब्रेकअपनंतर कशी सावरतेय सुष्मिता?
'हे नातं मैत्रीपासून सुरु झालेलं आणि आम्ही मित्रच असू... रिलेशनशिप केव्हाच संपलंय', असं लिहित सुष्मितानं ब्रेकअपवर शिक्कामोर्तब केलं.
मुख्य म्हणजे रोमननंही या नात्यातली मैत्री कायम ठेवल्याचं दिसत आहे. कारण रिलेशनशिप संपलं असलं तरीही तो तिच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करण्यापासून एका मित्राच्या बऱ्याच जबाबदाऱ्या पूर्ण करताना दिसतो.