मुंबई : सौंदर्याच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्यासोबत आता अशी एक घटना घडली आहे, ज्यामुळं ती चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या सुष्मिता चित्रपटांमध्ये फारशी सक्रिय नसली तरीही ती विविध कार्यक्रमांना मात्र हजेरी लावताना दिसते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशाच एका कार्यक्रमासाठी ती पोहोचली होती. तिथं एका दुकानातून बाहेर येतानाच सुष्मितासोबत असं काही घडलं की, दोन मिनिटांसाठी तीसुद्धा गोंधळली. दुकानाबाहेर येणाऱ्या सुष्मिताची एक झलक टीपण्य़ासाठी बाहेर काही छायाचित्रकार उभे होते. त्याचवेळी तीसुद्धा त्यांच्यासमोर पोझ देण्यासाठी म्हणून आली. 


पण, दुकानाबाहेर येतानाच तिचा पाय अडकला आणि तिथे ती अडखळली. 'अरे बापरे, अभी गिरते थे...' असे उद्गार यावेळी तिच्या तोंडून निघाले. स्वत:ला सावरत त्यानंतर सुष्मितानं दुसऱ्या ठिकाणी उभं राहून फोटोग्राफर्ससमोर पोझ दिली. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Voompla (@voompla)


सुष्मिता तिच्या रुपेरी पडद्यावरील कारकिर्दीसोबतच खासगी आयुष्यामुळंही चर्चेत आहे. दोन मुलींचं एकल मातृत्त्व सांभाळणारी ही अभिनेत्री एका खास व्यक्तीच्य़ा साथीनं अतिशय आनंदात आहे. ही व्यक्ती आहे तिचा प्रियकर रोमन शॉल. सुष्मिता आणि रोमनच्या नात्याचा सर्वांनाच हेवा वाटतो.