मुंबई : बॉलिवूड (Bollywood ) अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि ललित मोदी यांच्या नात्यावर काही दिवसांपूर्वीच शिक्कामोर्तब झालं. खुद्द मोदी यांनीच सोशल मीडियावर अभिनेत्रीसोबतचे फोटो पोस्ट करत या नात्याची ग्वाही दिली. एक अनपेक्षित नातं समोर आल्यामुळं अनेकांच्याच भुवया उंचावल्या होत्या. काहींनी तर, या नात्यावर टीकेची झोडही उठवली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिथे सुष्मिताच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरु असतानाच ती मात्र चित्रीकरण, विविध कार्यक्रमांना हजेरी लावणं या साऱ्यामध्ये व्यग्र दिसत आहे. आपल्यावर होणाऱ्या टीका आणि सोशल मीडियावर येणाऱ्या नकारात्मक प्रतिक्रियांना सुष्मितानं तिच्या परिनं उत्तरंही दिली आहेत. 


हे सर्व वातावरण शमत नाही, तोच पुन्हा एकदा तिच्या नावाची चर्चा रंगली आहे. यावेळी सुष्मिता प्रकाशझोतात आलिये ती म्हणजे Ex Boyfriend रोमन शॉल (ex boyfriend rohman shawl) याच्यासोबत वेळ व्यतीत करताना दिसल्यामुळे. 


आमिर खान याची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या 'लाल सिंग चड्ढा' (laal singh chaddha) या चित्रपटाच्या खास स्क्रीनिंगसाठी सुष्मिता पोहोचली होती. यावेळी रोमनही तिच्यासोबतच दिसला. सुष्मिताच्या दोन्ही मुलीसुद्धा चित्रपटगृहात दिसल्या. 



ललित मोदी यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना सुष्मिताचं रोमनसोबत वावरणं काहींना खटकलं. सोशल मीडियावर ज्यांना ही बाब खटकली त्यांनी एकतर खिल्ली उडवत किंवा मग उपरोधिक टीका करत सुष्मितावर निशाणा साधला.