मुंबई : अभिनय, मॉडेलिंग या क्षेत्रांसह खासगी आयुष्यात प्रेयसी, आई अशा भूमिका लिलया पेलणाऱ्या अभिनेत्री सुष्मिता सेन Sushmita Sen हिचा आज वाढदिवस. 45 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या सुष्मितानं कायमच तिच्या कृतीतून अनेकांनाच प्रेरित केलं आहे. बहुविध कारणांनी आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन तिनं सातत्यानं देऊ केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मिस युनिव्हर्स' या सौंदर्यस्पर्धेचं जेतेपद पटकावल्यानंतर सुष्मितासाठी बॉलिवूडचं दार खुलं झालं. फक्त चित्रपटच नव्हे, तर वेब सीरिज विश्वातही तिनं आपली छाप सोडली. चला तर मग जाणून घेऊया सुष्मिताच्या जीवनातील काही खास गोष्टींबद्दल... 


- सुष्मिता सेनचा जन्म हैदराबादमधील. तिचे वडील शबीर सेन हे भारतीय वायुदलातील निवृत्त विंग कमांडर. तर, आई ज्वेलरी डिझायनर. सुष्मिताला दोन भावंड. 


- तिचं कुटुंब पुढं दिल्लीला वास्तव्यास आलं. जेथे तिनं पुढील शिक्षण पूर्ण केलं. 


- 1994 मध्ये तिनं मिस इंडिया या सौंदर्यस्पर्धेत भाग घेतला होता. पण, ऐश्वर्या राय हिनंही या स्पर्धेत भाग घेतल्याचं कळतात तिनं यातून काढता पाय घेण्याची इच्छा व्यक्त केली. 


- ऐश्वर्यासोबत स्पर्धा करण्यासाठीचा आत्मविश्वास नसतानाही तिनं विजेतेपद पटकावलं. ऐश्वर्या या स्पर्धेत उपविजेती ठरली. 


- पुढे सुष्मितानं 'मिस युनिवर्स' या स्पर्धेत भारताचं प्रतिनिध्त्वं करत या स्पर्धेतील विजेतेपदाचा मुकुट पटकावला. 


- मिस इंडिया स्पर्धेसाठी सुष्मितानं घातेला गाऊन दिल्लीतील एका टेलरकडून शिवून घेण्यात आला होता. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्यामुळं आपण महागडा डिझायनर गाऊन घेऊ शकत नव्हतो, असं ती एका मुलाखतीत म्हणाली होती. 


- 'दस्तक' या चित्रपटातून तिनं कलाविश्वात पदार्पण केलं. 


- वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी सुष्मिताने Renee या तिच्या मुलीला दत्तक घेतलं. पुढं दहा वर्षांनी तिनं अलिशालाही दत्तक घेतलं. अनेक महिलांना एकल मातृत्त्वासाठी तिनं प्रेरित केलं. 



 


- 2014 च्या सुमारास तिनं Addison's disease नावाच्या रोगाशी लढा दिला. 


- मिस युनिव्हर्स स्पर्धेचं जेतेपद पटकावल्यानंतर 23 वर्षांनी सुष्मितानं याच स्पर्धेच्या परीक्षकपदाची जबाबदारी सांभाळली होती. 


- सध्याच्या घडीला सुष्मिता रोमन शॉल याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. सोशल मीडियावर ही जोडी फक्त कपल गोल्सच नव्हे, तर फिटनेस गोल्सही देत असते.