मुंबई : अभिनेत्री स्वरा भास्कर ही तिच्या चित्रपटांमुळे आणि विविध मुद्द्यांवर असणाऱ्या तिच्या ठाम भूमिकांसाठी ओळखली जाते. एक अभिनेत्री असण्यासोबतच स्वरा एक व्यक्ती, एक भारतीय आणि वैचारिक स्वातंत्र्यावर विश्वास ठेवणारा चेहरा म्हणून सर्वांवर प्रभाव पाडते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या स्वरा चर्चेचा विषय ठरत आहे ते म्हणजे तिच्या खासगी आयुष्यामुळे. जवळपास पाच वर्षे लेखक हिमांशू शर्मा याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या स्वराच्या याच नात्यात गेल्या महिन्यात फूट पडल्याची माहिती समोर आली. स्वराच्या ब्रेकअपच्या चर्चाही रंगल्या. ज्यानंतर 'रांझणा'फेम ही अभिनेत्री तिच्या काही खास मित्रमंडळींसोबत कन्याकुमारीला गेली होती. 


स्वराच्या आयुष्य़ात खास म्हटल्या जाणाऱ्या अशाच काही व्यक्तींच्या यादीत आता आणखी एक नाव जोडलं गेल्याची माहिती समोर येत आहे. 'स्पॉयबॉय ई'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार स्वराच्या आयुष्यातील ती व्यक्ती म्हणजे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांचा मुलगा आणि पत्रकार, रघू कर्नाड. 



 Yomeddine च्या स्क्रीनिंगच्या वेळी रघू आणि स्वरा एकत्रच आले होते, पण ज्यावेळी ते दोघंही या स्क्रीनिंगमधून एकत्र परत गेले तेव्हा मात्र अनेक चर्चांनी डोकं वर काढलं. कारण स्क्रीनिंगनंतर ते दोघंही जेवणासाठी एका शांत अशा ठिकाणी गेल्याचंही पाहायला मिळालं. सध्याच्या घडीला या नात्याविषयी फार माहिती नसली तरीही स्वरा आणि रघूच्या या खास मैत्रीपूर्ण नात्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे हे मात्र खरं.