मुंबई : केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाचा वाद दिवसागणिक जास्तच चिघळत असून आता या वादाला मोठ्या प्रमाणात हिंसक वातावरण मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच परिस्थितीकडे पाहता केरळमध्ये स्थानिक प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर काळजीही घेतली जात आहे, पण तरीही काही हिंदूत्ववादी संघटनांचा शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाला होणारा विरोध काही मावळण्याचं नाव घेत नाही आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतिशय तणावाच्या या वातावरणात नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही व्यक्ती पोलीस स्थानकावरच गावठी बॉम्ब फेकताना दिसत आहेत. नेडुमांगडू या पोलीस स्थानकावर बॉम्ब फेकणारे हे व्यक्ती आरएसएसशी संबंधित असल्य़ाचं कळत आहे. सोशल मीडियावर चर्चेच असणाऱ्या याच मुद्द्यावर अभिनेत्री स्वरा भास्कर हिने आपलं मत मांडलं आहे. 


एका ट्विटमध्ये तिने यासंबंधीचा व्हिडिओ पोस्ट करत, 'माझ्या मते कोणत्याही ठिकाणी त्यातूनही पोलीस स्थानकावर बॉम्ब हल्ला करणाऱी ही माणसं दहशतवादीच आहेत' असं ट्विट तिने केलं. त्यानंतर सर्वत्र भगव्याचीच दहशत आहे, असं म्हणत स्वराने या परिस्थितीवर अस्वस्थता व्यक्त करणारं ट्विट केलं. 




तिचं हे ट्विट पाहता आता त्यावरही अनेकांनी व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. केरळमधील शबरीमला येथे असणाऱ्या अय्यप्पा स्वामी मंदिरात मासिक पाळी येणाऱ्या महिलांच्या प्रवेशास सक्त मनाई होती. पण, काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालाने सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी असण्याचा निर्णय देत एका नव्या पर्वाचा प्रारंभ झाला. अनेक स्तरांतून या निर्णयाचं स्वागत झालं. पण, काही हिंदूत्त्ववादी संघटनानी मात्र या निर्णयाचा विरोध केला. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून होणारा विरोध अतिशय तीव्र स्वरुपाचा होता. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनीही संघाकडून होणाऱ्या या विरोधाची निंदा करत केरळला युद्धभूमी केल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. त्यामुळे आता येत्या काळात हा विरोध शमणार की देवभूमीत हिंसा आणखी पेटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.