बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसह (Shahrukh Khan) काम करण्याची संधी मिळावी अशी प्रत्येक अभिनेत्रीची इच्छा असते. पण इंडस्ट्रीत इतकी वर्षं काम केल्यानंतरी तब्बूने (Tabu) आजपर्यंत शाहरुख खानसह एकाही चित्रपटात काम केलेलं नाही. 2002 मध्ये आलेल्या 'साथिया' चित्रपटानंतर 'ओम शांती ओम' चित्रपटात दोघे एकत्र झळकले होते. पण दोन्ही चित्रपटात हा काही सेकंद, मिनिटांचा कॅमिओ होता. त्यामुळे नेमकं असं काय कारण आहे ज्यामुळे शाहरुख खान आणि तब्बू यांनी इतकी वर्षं झाली तरी एकदाही एकत्र काम केलेलं नाही. आता तब्बूनेच याचा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तब्बूने Galatta India ला दिलेल्या मुलाखतीत असुरक्षित अभिनेत्यांसह काम करताना आलेला अनुभव आणि शाहरुख खानसह नाकारलेले चित्रपट यावर भाष्य केलं. तब्बूने सांगितलं की, "भलेही मी म्हणावं की, तुम्हाला सुरक्षित सह-अभिनेता मिळणं महत्त्वाचं आहे". पुढे ती हसत म्हणाली, "तुम्हाला जे काही मिळतं त्यावरच काम चालवावं लागतं".


तब्बूने पुढे सांगितलं की, "मी निर्माता, दिग्दर्शक किंवा स्क्रीन रायटर नाही आहे. तसंच शाहरुख पुढचा चित्रपट कोणता करणार आहे हेदेखील मी ठरवत नाही. तसंच त्याला यापुढे कोणता चित्रपट ऑफर होणार आहे याची मला माहिती नसते. मी फक्त त्याच चित्रपटांना हो किंवा नाही म्हणू शकते ज्या मला ऑफर होतील. आम्हाला एकत्र काही चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. पण काहींना मी नकार दिला आणि काहींना त्याने नकार दिला. आम्ही एकत्र काम करु शकू असं काहीच झालेलं नाही. पण अनेक लोकांना मला आणि शाहरुखला एकत्र पाहायचं आहे याचा मी आदर करते".


तब्बूने यावेळी कमी बजेटच्या चित्रपटांवर भाष्य करत म्हटलं की, "सर्व लोकांनी मला असे चित्रपट करु नको असं सांगितलं होतं. असे चित्रपट तुझं करिअर संपवतील असं मला सांगण्यात आलं होतं. लोकांना सांगितलं होतं, तुझा मेकअप होणार नाही, कर्मशिअल करिअर खराब होईल. तुला अशा भूमिका आणि डार्क रोल टाळायला हवे. पण मी कोणाचं ऐकलं नाही. अन्यथा मी काम करु शकले नसते. जेव्हा मला अशा गोष्टी करण्यापासून रोखलं जातं, तेव्हा मला त्या एक्स्पोअर करायला आवडतं. मी माझ्या अंदाजानुसार गोष्टींकडे पाहते".


तब्बू 'औरो मे कहाँ दम था' मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ती अजय देवगणसोबत (Ajay Devgan) झळकणार आहे. या चित्रपटात जिमी शेरगिलही (Jimmy Shergil) प्रमुख भूमिकेत आहे. अजय देवगण आणि तब्बूचा हा एकत्रित 10 वा चित्रपट आहे. .