मुंबई : बॉलिवूडचे अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्री तनुश्री दत्ताने १० वर्षांनंतर लावलेल्या लैगिंक अत्याचाराच्या आरोपांनंतर ६ महिन्यांपूर्वी चित्रपटसृष्टीत #MeToo मोहिम सुरू झाली. तनुश्रीने आरोपांमध्ये नाना पाटेकर यांच्यासह घटनेवेळी सेटवर हजर असणारे राकेश सारंग, सामी सिद्दीकी आणि गणेश आचार्य यांच्यावरही आरोप लावले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा या तनुश्रीने चौघांवर टीका करत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 'हॉर्न ओके प्लीज' या 'चित्रपटाच्या गाण्यासाठी मीच गणेश आचार्य यांची शिफारस केली होती परंतु त्यांनी माझी कोणतीही मदत केली नाही. माझ्या एफआयआरमध्ये चार आरोपींमध्ये त्यांचेही नाव समाविष्ठ आहे. माझा केवळ एक नाही तर या चौघांनी छळ केला आहे. त्यावेळी मी केवळ २४ वर्षांची होती आणि बॉलिवूडमध्ये करियरच्यादृष्टीने वाटचाल करत होती. गणेश आचार्यने प्रसार माध्यमांमध्ये माझ्याबद्दल उलट-सुलट चर्चा पसरवत माझ्या करियरमध्ये अडचणी निर्माण केल्याचं तनुश्रीने सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'राखी सावंतद्वारा माझ्यावर अपमानजनक आरोप लावण्यामागेही गणेश आचार्यचा हात होता. १० वर्षांपूर्वी ते आता ६ महिने आधी भारतात राहुन इतका अपमान सहन करूनही मी जीवंत असल्याचं तिने म्हटलं. राखी, गणेश आचार्य, नाना पाटेकर, राकेश सारंग, सामी सिद्दीकी या सर्वांना मी शाप देते. कोणतीही व्यक्ती या लोकांशी जोडलेली असेल त्या सर्वांना माझा शाप लागेल. तुमची मुलं आणि त्यांच्या मुलांनाही त्याच मानसिक आणि भावनिक अडचणींतून जावं लागेल ज्यातून मी आणि माझं कुटुंब गेलं आहे' अस ती म्हणाली.


तुमच्या मुलांना शारीरिक आणि मुलींना मानसिक, भावनात्मक अडचणींतून जावं लागेल असं म्हणत तुमची कधीच प्रगती होणार नाही हा शाप देखील तनुश्रीने दिला आहे. यावेळी आपला अपमान झाल्याचा प्रचंड संताप तिने व्यक्त केला. ज्याने माझा अपमान केला आहे त्या सर्वांना माझा शाप लागेल. माझ्याजवळच्या सर्व वाईट गोष्टी मी तुम्हाला परत केल्या आहेत. कोणताही पंडीत किंवा पुजारी तुम्हाला या शापापासून वाचवू शकत नाही. कोणताही देव तुमची कोणतीही मदत करणार नाही, त्यांच्याकडे मदत मागू नका. शेवटी वेळेसह परमात्माच तुमच्या या साऱ्याची शिक्षा देईल' अशा शब्दात तनुश्रीने पुन्हा एकदा सर्वांवर निशाणा साधला आहे.