मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात इतरी वाढ झाली आहे, की गृहिणीच नव्हे तर भजी विक्रेत्यांपासून मोठमोठाल्या हॉटेलांपर्यंत सर्वत्रच कांदा पानातून दिसेनासा ढाला आहे. प्रतिकिलोमागे वाढलेले कांद्याचे दर काह कांदा न चिरताच ग्राहकांना रडवू लागले आहेत. यापासून सेलिब्रिटी मंडळीसुद्धा प्रभावित झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता अक्षय कुमार याची पत्नी ट्विंकल खन्ना हिने मात्र यावर एक तोडगा काढला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्विंकलने संकेतस्थळासाठीचा एक ब्लॉग शेअर करत त्यामध्ये अशा काही पाककृती सर्वांच्या भेटीला आणल्या आहेत, ज्यामध्ये चक्क कांद्याचा वापरच करण्यात आलेला नाही. 


कांद्याच्या वाढत्या दरांवर सरकारला नियंत्रण ठेवता आलेलं नाही. याचाच फटका सर्वसामान्यांना बसत आहे. हेच कारण पुढे करत सत्ताधाऱ्यांवर नेहमीच्याच शैलीत उपरोधिक शब्दांत टीका केली. कांद्याची तुलना महागड्या अवाकाडोशी करत ट्विंकलने या ब्लॉगमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या संसदेत केलेल्या कांद्यावरील भाषणावरही टीका केली. ज्यानंतर तिने आपला मोर्चा चवदार आणि तितक्याच भन्नाट पाककृतींकडे वळवला. 



विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ



पाव भाजी, चिकन करी, राजमा चावल, वांग्याचं भरित आणि मटण खीमा अशा शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांच्या पाककृती तिने सर्वांच्या भेटीचा आणल्या. साहित्य आणि कृती या माहितीसह तिने या पदार्थांची छायाचित्रही पोस्ट केली आहेत. त्यामुळे कांदा नसला तरीही खवैय्यांचा वांदा होणार नाही हेच ट्विंकलने एका अर्थी दाखवून दिलं आहे. तेव्हा आता एखादा मस्त बेत आखत थेट स्वयंपाकघराची वाट धरत यापैकी एखादा पदार्थ बनवण्याचा घाट तुम्ही केव्हा घालताय?