सैफला Kidnap करण्याच्या तयारीत `ही` अभिनेत्री; करिनाला याची खबर मिळताच....
सैफ सध्या त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे.
मुंबई : सैफ अली खान आज त्याचा 51वा वाढदिवस साजरा करत आहे. सैफ सध्या त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे. मुलगा जेहच्या जन्मानंतर करीना-सैफची सुट्टीवर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. नुकतेच या दोघांच्या वेकेशनचे फोटो समोर आले आहेत. ज्यात हे जोडपं रोमँटिक स्टाईलमध्ये दिसत आहे. करीनाचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण फक्त करीनाच नाही तर आणखी एक अभिनेत्री आहे जी सैफवर फिदा आहे
सैफवर फिदा परिणीती
सैफ अली खानची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. बॉलिवूड अभिनेत्रींमध्येही सैफची खूप लोकप्रियता आहे आणि यामध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे परिणीती चोप्रा. परीने अनेकवेळा स्पष्ट केलं आहे की, सैफ अली खान तिचा क्रश आहे आणि संधी मिळाल्यास ती त्याला किडनॅप करू शकते.
सैफने व्हिडिओ पाहिला होता
एकदा सैफ अली खान त्याच्या एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'द कपिल शर्मा शो' मध्ये पोहोचला होता. त्यावेळी कपिलने सैफला एक व्हिडिओ दाखवला जेव्हा परी त्याच्या शोमध्ये पोहोचली होती आणि तिने सैफवरील प्रेम व्यक्त केलं होतं. परीने सांगितलं होतं की, जर तिला संधी मिळाली तर ती सैफला किडनॅप करेल. यासोबतच तिनं हे देखील सांगितलं की, करीनाला याबद्दल आधीच माहिती आहे की, मला सैफ अली खान किती आवडतो.
सैफ झाला स्तब्ध
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जेव्हा कपिलने सैफला त्याची प्रतिक्रिया विचारली तेव्हा सैफ पूर्णपणे अवाक झाला. त्याला काय बोलावं ते समजत नव्हतं. यासोबतच कपिलने गमतीने म्हटलं की, जर नशीब असावं तर सैफ अली खानसारखं आधीच करीनासारखी पत्नी मिळाली आहे आणि आता परिणीतीलाही त्याला किडनॅप करायचं आहे.