मुंबई : कलाजगतामध्ये नात्यांच्या समीकरणांत होणारे बदल काही नवे नाहीत. आज सारंकाही सुरळीत सुरु आहे, असं सांगणाऱ्या कलाकारांच्या नात्यात कधी वादळ येतं याची कल्पनाही अनेकांना नसते. याच परिस्थितीची प्रचिती आजवर अनेकदा आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही कलाकारांनी त्यांच्या वैवाहिक नात्याला तडा गेल्यानंतर नव्यानं आयुष्याची सुरुवात केली. पण, काही नावं मात्र याला अपवाद ठरली. 


Jennifer Winget: करण सिंह ग्रोवरशी जेनिफरनं लग्न केलं खरं. एका मालिकेपासूनच त्यांच्या नात्याचे बंध आणखी घट्ट झाले होते. 


चार वर्षांतच हे नातं संपलं. बिपाशा बासुसाठी करणनं जेनिफरला घटस्फोट दिला. सध्या Jennifer Winget मात्र Single च आहे. 



Karisma Kapoor: संजय कपूर याच्याशी करिष्मानं 2003 मध्ये लग्नगाठ बांधली. पण, या नात्याच सारंकाही आलबेल नव्हतं. अखेर 2016 मध्ये त्यांनी वेगळ्या वाटा निवडल्या. 


संजयनं प्रिया सचदेवशी लग्न करत नवं वैवाहिक आयुष्य सुरु केलं. पण, करिष्मानं असं काही न करता आपल्या मुलांच्या संगोपनावरच भर दिला. 



Reena Dutta: अभिनेता आमिर खान यानं 1986 मध्ये कुटुंबाविरोधात जात रिना दत्ताशी लग्न केलं होतं. 


दोन मुलांच्या जन्मानंतर 2002 मध्ये त्यांच्या नात्याला तडा गेला. आमिरनं किरण रावशी लग्न करत एका नव्या नात्याची सुरुवात केली. पण, रिनानं असं काहीही केलं नव्हतं. 



Pooja Bedi: अभिनेत्री पूजा बेटी आणि फरहान फर्नीचरवाला यांनी 1994 मध्ये लग्न करत सहजीवनाची सुरुवात केली. 


ही जोडीसुद्धा पुढे जाऊन वेगळी झाली. फरहाननं दुसरं लग्न केलं. पण, पूजानं तसं काही केलं नाही. 



Amrita Singh: अभिनेता सैफ अली खान याची पहिली पत्नी अमृता सिंग ही एकावेळी बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री होती. पण, लग्नानंतर तिनं कुटुंबाला प्राधान्य दिलं. 


पाहता पाहता सैफसोबतचं तिचं नातं बदललं आणि या जोडीनं घटस्फोट घेतला. सैफनं पुढे करिना कपूरशी लग्न केलं. पण, अमृता मात्र दुसऱ्या लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचली नाही.