मुंबईः बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने वयाची 50शी ओलांडली तरी अविवाहित आहेत हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे, मात्र बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या वयाची पन्नाशी ओलांडली तरी अविवाहित आहेत. परफेक्ट पार्टनर शोधण्यात त्यांनी कधी पन्नाशी गाठली समजलंच नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


तब्बू: 90 च्या दशकापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणारी ही तब्बू आजही चित्रपटांमध्ये सक्रिय आहे आणि प्रत्येक वेळी तिच्या भूमिकांमधून ती वेगळी छाप सोडते. तब्बू 51 वर्षांची आहे पण आजपर्यंत तिला योग्य जोडीदार मिळालेला नाही. तब्बूला एकटे राहणे आवडते आणि सध्या ती स्वतःच्या मनाप्रमाणे आयुष्य जगत आहे.(फोटो - सोशल मीडिया)



सुष्मिता सेन: मिस युनिव्हर्स सुष्मिताचे आजही लाखो चाहते आहेत,  46 वर्षांची सुष्मिता सेन आजही सिंगल आहे. रोहमन शॉलला बराच काळ डेट केल्यानंतर दोघेही वेगळे झाले आहेत.(फोटो - सोशल मीडिया)



अमीषा पटेल: मासूम सोनियाने तिच्या पहिल्या चित्रपट 'कहो ना प्यार है' मधून सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवाल मात्र आजपर्यंत अमीषा पटेलचे हृदय कोणासाठीही धडधडले नाही. त्यामुळे 45 वर्षांची झालेली अमिषा अजूनही सिंगल आहे. अमिषा पटेलचं अद्याप लग्न झालेले नाही.(फोटो - सोशल मीडिया)



साक्षी तन्वर: टीव्ही ते चित्रपट आणि चित्रपट ते ओटीटी असा प्रवास करणारी साक्षी तन्वर देखील एक अप्रतिम अभिनेत्री आहे. पण तिनेही एकटे राहण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतं. 49 वर्षीय साक्षी तन्वर सिंगल मदर आहे, तिने एक मुलगी दत्तक घेतली आहे.(फोटो - सोशल मीडिया)



तनिषा मुखर्जी: अजय देवगणसाठी काजोलच्या हृदयाचा ठोका चुकला आणि दोघांनी लग्न केले पण काजोलची बहीण तनिषा मुखर्जीचा परिपूर्ण वराचा शोध आजही सुरू आहे. या 44 वर्षीय तनिषाने अभिनयात परतण्याचा विचार केला आहे, परंतु ती लग्न कधी करणार हे फक्त देवालाच ठाऊक. (फोटो - सोशल मीडिया)



रॉकस्टारमुळे रातोरात प्रसिद्ध झालेल्या नर्गिस फाखरीचं नाव रणबीर कपूरसारख्या स्टारसोबतही जोडलं गेलं, पण आजपर्यंत नर्गिसने लग्न केलं नाही. नर्गिस क्वचितच चित्रपटांमध्येही दिसते. तसंच नर्गिसनं आपला फिटनेस एवढा जपलाय की तिचं वय 42 आहे हे सांगणे कठीण आहे. (फोटो - सोशल मीडिया)