मुंबई : वयाच्या 50व्या वर्षीही अभिनेता सलमान खानची महिला चाहत्यावर्गात प्रचंड क्रेझ आहे.  त्याचा महिला चाहता वर्ग जरी मोठा असला तरी बॉलीवूड इंडस्ट्रीमधल्या अश्या एक दोन नव्हे तर तब्बल सात हिरोईन्स आहेत ज्यांनी सलमानसोबत सिनेमांत काम करायला नकार दिला आहे. यामध्ये अशा अनेक चित्रपटांचा देखील समावेश आहे, जे बॉक्सऑफसवर हिट झाले आहेत...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिका पदुकोण 
दिपाकाने सलमानच्या एक-दोन नव्हे तर एकूण पाच चित्रपटांची ऑफर नाकारली आहे. एका रिपोर्टनुसार दीपिकाला सलमानचा 'जय हो', 'बजरंगी भाईजान', 'किक', 'प्रेम रतन धन पायो', 'सुलतान' आणि 'शुद्धि' या सिनेमांची ऑफर देण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव तिने या ऑफर नाकारल्या. फिल्मफेअर अवॉर्ड्सच्या मंचावर सलमान खानने एकदा दीपिकाला याबवरुन टोमणाही मारला होता. तो म्हणाला की, ''तुला तर माझ्याबरोबर चित्रपटांत काम करायची ईच्छा नाही



 


कंगना रानौत
एका मीडिया रिपोर्टनुसार कंगनाला सलमान खानच्या 'सुलतान' चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती, मात्र तिने हा सिनेमा करण्यास नकार दिला. यानंतर सलमान आणि अनुष्काची जोडी सुलतानमधील प्रेक्षकांना खूप आवडली होती आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.



अमृता राव
'विवाह' या सिनेमातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री अमृता रावला सलमान खानच्या 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटाची ऑफर मिळाली. या चित्रपटात अमृता सलमान खानच्या बहिणीची भूमिका साकारणार होती, मात्र तिने नकार दिला. यानंतर स्वरा भास्करने ही भूमिका पार पाडली.



अमिषा पटेल
'कहो ना प्यार है' या पहिल्या चित्रपटातून रातोरात स्टार बनलेली अमिषा पटेल आजकाल इंडस्ट्रीतून गायब झाली आहे. अमिषाने सलमानबरोबर डेव्हिड धवनच्या 'ये है जलवा' सिनेमात काम केलं होतं, जो सिनेमा बॉक्स ऑफिसवर वाईट प्रकारे पडला. यानंतर या दोघांची जोडी पुन्हा कधीच एकत्र दिसली नाही. एका वृत्तानुसार, त्याच वेळी अमीषाला सलमान खानसोबत चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती, मात्र अमिषाने तो सिनेमा करण्यास नकार दिला.



सोनाली बेंद्रे
'हम साथ साथ हैं' या चित्रपटात सलमान खान आणि सोनाली बेंद्रेची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. मात्र या सिनेमामुळे सलमानच्या आयुष्यात एक मोठी समस्या निर्माण झाली. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राजस्थानच्या जोधपूरमध्ये काळ्या हरिणांच्या शिकार केल्या प्रकरणी ते चांगलाच अडचणीत आला होता. या घटनेनंतर अनेक दिग्दर्शकांनी पुन्हा सोनाली आणि सलमानची जोडी पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला पण सोनालीने त्याच्यासोबत काम करण्यास नकार दिला



ट्विंकल खन्ना
सलमानसोबत ट्विंकल खन्नाचा 'जब प्यार किस से होता है' हा सिनेमा 1998 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाची गाणी सुपरहिट झाली. चित्रपटात दोघांची जोडीही लोकांना चांगलीच पसंत पडली. मात्र त्यानंतर ट्विंकलने सलमानबरोबर कधीच काम केले नाही.